प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : पुणे शहरातील लष्कर वाहतूक विभागांतर्गत मेलोडीना रोडवरील नेहरू मेमोरियल चौक (HP पेट्रोल पंप) ते नवीन ZP इमारत रोड दरम्यान महावितरण विभागाकडून भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम शनिवार, 13 डिसेंबर 2025 रोजी रात्री 9.00 वाजल्यापासून सुरू होणार असून 15 डिसेंबर 2025 पर्यंत (3 दिवस) चालू राहणार आहे.

दरम्यान, नेहरू मेमोरियल चौक ते SGS मॉल (ऐकरी लेन) या मार्गावरील वाहतूक सुरू राहणार आहे.
कामाच्या कालावधीत आवश्यकतेनुसार (सार्वजनिक PMPML बसेस वगळता) चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक SBI ट्रेझरी बँकमार्गे इस्कॉन मंदिर – तीन तोफा चौक मार्गे कॅम्प व हडपसर परिसराकडे वळवण्यात येणार आहे.
या ठिकाणी आवश्यक तो सर्व पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांनी नियोजित पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.







