Pune News: पुणे: पुण्यात एका 16 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अकस्मात मृत्यू झाला. क्लासमध्ये शिकत असताना अचानक चक्कर येऊन पडल्यानंतर मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत परंतु उपचार सुरु होण्याआधीच डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले. या घटनेनंतर त्याचा कुटुंबियांना मोठा धक्काच बसला आहे. Pune News

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस संतोष शेलार असं मृत तरुणाचे नाव आहे. तो अकरावीत शिकत होता. जंगली महाराज येथे क्लासला गेला होता. क्लासमध्ये शिकवणी घेत असताना त्याला अचानक चक्कर आली. त्यानंतर क्लास व्यवस्थापकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. श्रेयसच्या आईवडिलांना या घटनेची माहिती दिली. पंरतु डॉक्टरांनी उपचार सुरु करण्याआधीच त्याला मृत घोषित केले. श्रेयसला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिपोर्टनंतर श्रेयसच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या घटनेनंतर श्रेयच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आपला मुलगा क्लासमध्येच असेल असा मानसिक धक्का आईला लागला आहे. श्रेयच्या जाण्याने त्याच्या मित्र परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.







