पिंपरी- चिंचवड : हिंजवडी (Pimpri-Chinchwad) येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण होते. यंदाही मुसळधार पावसामुळे आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या गंभीर परिस्थितीमुळे पायाभूत सुविधांच्या कमतरतेवर अनेक प्रश्न उभे राहिले. MIDC चे कार्यकारी अभियंता राजेंद्र तोतला यांनी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तब्बल 125 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडा तयार केल्याचे सांगितले आहे. हा महत्त्वाकांक्षी आराखडा दोन टप्प्यांमध्ये राबवला जाणार आहे.

हिंजवडीतील पाणी साचण्याच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) तातडीने ड्रोन सर्वेक्षण करून प्रकल्प आराखडा तयार केला आहे.
कसा आहे 125 कोटींचा उपाययोजना आराखडा?
डोंगरावरून येणारे पाणी थेट नदीपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र आणि नवीन नैसर्गिक जलमार्ग विकसित करण्यात येणार आहेत. आयटी पार्कच्या आत भूमिगत वाहिन्यांचे मोठे जाळे तयार केले जाणार आहे. जी 17.5 किलोमीटर लांबीची असणार आहे. पाणी साचणाऱ्या मुख्य मार्गांवर काँक्रीटचे भुयारी नाले बांधले जातील. याव्यतिरिक्त,
या उपाययोजनांमुळे हिंजवडीतील पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी दूर होऊन आयटी कंपन्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा MIDC ने व्यक्त केली आहे.





