प्रतिनिधी- पोपट पाचंगे

Pune Leopard News: रांजणगाव : रांजणगाव ता. शिरुर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील एलजी आणि फियाट कंपनीमध्ये कामगारांना कंपनीच्या आतमध्ये असलेला बिबट्या वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
हेही वाचा- आजची रात्र खास! श्रीदत्तजयंतीच्या रात्री दिसेल ‘सुपरमून’, आज दिसणार 14 टक्के अधिक मोठा चंद्र
रांजणगाव गणपती ता. शिरुर येथील औद्योगिक वसाहतीतील एल जी आणि फियाट कंपनीमध्ये कामगारांना कंपनीच्या आतमध्ये दिसलेला बिबट्या दिसून आल्याने खळबळ उडाली होती, त्यांनतर शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने प्रथम एलजी आणि नंतर फियाट कंपनीच्या आवारामध्ये दोन दिवस बिबट्याचा शोध घेतला मात्र अपयश आले त्यांनतर वनविभागाच्या वतीने फियाट कंपनीच्या आतमध्ये दोन पिंजरे लावण्यात आले होते.
अखेर आज गुरुवारी, दि.४ पहाटेच्या वेळी सुरक्षारक्षकास पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे निदर्शनास आले, याबाबतची माहिती मिळताच शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी भानुदास शिंदे, वन्यजीव बचाव पथकाचे मनोज चौधरी, शेरखान शेख, जयेश टेमकर, अमोल कुसाळकर, संदीप गव्हाणे, मंगेश ओव्हाळ यांसह रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी घटनास्थळी धाव घेत, फियाट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खत्री, सुधीर भाले, गौतम भोसले व सरवर शेख यांसह आदींच्या उपस्थितीत बिबट्याला ताब्यात घेतले.
पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या अंदाजे पाच वर्षे वयाचा आणि नर प्रवर्गातील असून सदर बिबट्याची रवानगी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी सांगितले. विभागच्या पथकाने दोन दिवस अथक प्रयत्न करुन बिबट्या जेरबंद केल्याने औद्योगिक वसाहततील कंपन्याच्या कामगारांनी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.






