पुणे: घरासमोर अंगणात लहान मुले खेळत (Pune Leopard Attack) असताना अचानक (Leopard In Pune) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी (Pune News) झालेला 5 वर्षांचा निमिष अखेर दोन आठवड्यांच्या उपचारानंतर बरा होऊन घरी परतला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र निमिषच्या जिद्दीने आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांनी त्याचा जीव वाचला.(Breaking News)

बिबट्याची अचानक झडप (Marathi News)
शेवगाव तालुक्यातील संगमनेरजवळील एका गावात ही घटना घडली. निमिष इतर मुलांसोबत घराबाहेर खेळत होता. अचानक जंगलातून बिबट्या बाहेर आला. बिबट्याला पाहताच इतर मुले घाबरून पळून गेली. मात्र निमिष खूप लहान असल्याने त्याला धोका कळला नाही आणि तो तसाच उभा राहिला. याच संधीचा फायदा घेत बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. बिबट्याने निमिषच्या मानेचा चावा घेत डोके, मांडी आणि कानावर खोल जखमा केल्या. (Latest Breaking News)
बिबट्याच्या जबड्यातून मुलाला सोडवले
निमिषची आई रेवती शिंदे यांनी प्रसंगावधान राखत थेट बिबट्याच्या जबड्यातून आपल्या मुलाला सोडवले. या झटापटीत निमिष गंभीर जखमी झाला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो बेशुद्ध अवस्थेत होता. तातडीने त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
जखमा अन् रक्तस्त्राव
सूर्या हॉस्पिटलमध्ये निमिषवर बहुआयामी उपचार करण्यात आले. डोक्यावरील, चेहऱ्यावरील आणि कानावरील जखमा प्लास्टिक सर्जननी दुरुस्त केल्या. कान, डोळे आणि अंतर्गत रक्तस्रावावर तज्ज्ञ डॉक्टरांनी उपचार केले. बिबट्याच्या चाव्यामुळे रेबीज आणि धनुर्वाताची लस तातडीने देण्यात आली. जखमांमुळे झालेल्या अतिरक्तस्रावामुळे अनेक वेळा रक्त द्यावे लागले.
निमिष पूर्णपणे बरा झाला
निमिष सुमारे 7 दिवस लाइफ सपोर्टवर होता. संसर्गाचा धोका वाढत होता, काही अवयव निकामी होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र डॉक्टरांच्या सततच्या उपचारामुळे आणि निमिषच्या जिद्दीमुळे परिस्थिती हळूहळू सुधारली. सुमारे 2 आठवड्यांच्या उपचारानंतर निमिष पूर्णपणे बरा झाला असून त्याला कोणतेही दीर्घकालीन दुष्परिणाम राहिलेले नाहीत. ही घटना धैर्य, मातृत्व आणि वैद्यकीय सेवांची ताकद दाखवणारी ठरली आहे.





