पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार (Pune Land Scam) प्रकरण सध्या राज्यभरात (Mundhawa Land Scam) चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांचे नाव समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) यांचे नाव पुढे आले असून त्या सध्या (Ranbir Kapoor) पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. (Pune News)

प्रकरणाचा थेट बॉलिवूडशी संबंध? (Pune)
पोलिस तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून यामध्ये थेट बॉलिवूडशी संबंधित एक प्रकरण उघडकीस आले आहे. शीतल तेजवानी यांचा बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यांच्याशी झालेला वाद समोर आला असून त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, शीतल तेजवानी यांनी रणबीर कपूर यांच्या विरोधात 50 लाख रुपये नुकसानभरपाईचा दावा दाखल केला आहे. (Breaking News)
भाडेकरारातील अटींचं उल्लंघन
हा वाद पुण्यातील ट्रम्प टॉवरमधील एका फ्लॅटच्या भाडेकराराशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. शीतल तेजवानी आणि रणबीर कपूर यांच्यात फ्लॅटचा भाडेकरार झाला होता. मात्र रणबीर कपूर यांनी या भाडेकरारातील अटींचे उल्लंघन केले, असा आरोप तेजवानी यांनी केला आहे. विशेषतः लॉक-इन कालावधी पूर्ण न करता फ्लॅट सोडल्यामुळे आपले मोठे नुकसान झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी त्यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असून हा दावा सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 जानेवारी 2026 रोजी होणार आहे.
हेही वाचा: पुण्यात शिवसेना नेत्याच्या वडिलांच्या निधनानंतर हडपसरच्या सह्याद्री रुग्णालयात राडा; नेमकं काय घडलं?
आर्थिक गुन्ह्यांचा गुन्हा दाखल
दरम्यान, मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीतील 1% भागीदार दिग्विजय पाटील यांच्यावरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यांची एकदा चौकशी करण्यात आली असून पुन्हा चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. या प्रकरणात शीतल तेजवानी आणि सूर्यकांत येवले यांच्याविरोधात आर्थिक गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच रवींद्र तारू यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Marathi News)
या पार्श्वभूमीवर अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांच्याभोवती तपासाची फास आवळली जाणार का आणि पुढे काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.







