पुणे: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Pune Politics) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (Pune Election) वेगळ्या वर्गाला लक्ष्य करत रणनीती (Ajit Pawar) आखली जात असल्याचे (Pune NCP) चित्र दिसत आहे. निवडणुकीच्या तयारीचा पहिला टप्पा म्हणून सर्व राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागवण्यात आले असून त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या प्रकारची भूमिका घ्यायची आणि कोणत्या मुद्द्यांवर भर द्यायचा, यावर सर्व पक्षांकडून विचारमंथन सुरू झाले आहे. (Pune News)

जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. भाजपकडून घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या आणि अपेक्षा जाणून घेत त्याच्या आधारावर वचननामा तयार केला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसनेही जाहीरनामा तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली असून त्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. (Breaking News)
पुढच्या पिढीच्या अपेक्षांवर भर
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्यालयात यासंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जाहीरनाम्याची प्राथमिक रूपरेषा निश्चित करण्यात आली. याबाबत माहिती देताना शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी सांगितले की, पुणे शहराच्या वाढत्या गरजा, आधुनिक शहरी जीवनशैली आणि पुढील पिढीच्या अपेक्षा लक्षात घेऊन जाहीरनामा तयार केला जात आहे. (Marathi News)
दैनंदिन अडचणींवर ठाम उपाययोजना
या जाहीरनाम्यात वाहतूक व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सुविधा, उद्याने, स्मार्ट तंत्रज्ञान, महिलांची सुरक्षितता आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी यांसारख्या विषयांवर ठोस उपाययोजना समाविष्ट केल्या जाणार आहेत. (Marathi Batmya)
Gen Z पिढीच्या गरजांवर लक्ष केंद्रित
विशेषतः युवक आणि Gen Z पिढीच्या गरजांवर लक्ष केंद्रित करत रोजगारनिर्मिती, नवोपक्रम, स्टार्टअप संस्कृती, आधुनिक सार्वजनिक सेवा आणि तंत्रज्ञानावर आधारित शहर व्यवस्थापन या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असल्याचे सुनील टिंगरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा हा केवळ आश्वासनांचा दस्तऐवज नसून पुणेकरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी कृती योजना असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






