नागपूर: पुण्यातील खराडी (Pune Crime) बायपास परिसरातील चंदन नगर (Nagpur News) झोपडपट्टीतील भीषण आगीच्या घटनेला आता 8 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही झोपड्यांना आग लावणाऱ्या संबंधित विकासकावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. या पार्श्वभूमीवर बुधवारी नागपूरमधील यशवंत स्टेडियममध्ये एका पीडित मातेने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. (Breaking News)

दोन्ही तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू
23 एप्रिल 2025 रोजी खराडी बायपास परिसरातील चंदन नगर झोपडपट्टीत विकासकाने मुद्दाम आग लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आगीत सुमारे 100 झोपड्या जळून खाक झाल्या. या दुर्घटनेनंतर भीती आणि मानसिक तणावामुळे दोन तरुणांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. हे दोन तरुण सीताबाई धोंडे यांच्या कुटुंबातीलच होते. घटनेनंतर 225 दिवस उलटूनही आरोपी विकासकाला अटक न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. (Marathi News)
अचानक ओतून घेतलं अंगावर रॉकेल
या अन्यायाविरोधात अखिल मांजराई नगर नागरिक कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत होते. विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात बुधवारी यशवंत स्टेडियम येथे पीडितांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्याचवेळी सीताबाई धोंडे यांनी अचानक अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. दुपारी सव्वा एकच्या सुमारास हा प्रकार घडला. उपस्थित महिलांनी आरडाओरड केल्यानंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून मोठी दुर्घटना टाळली. (Maharashtra News)
आंदोलकांचा आरोप आहे की, झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली विकासकाने बनावट संमतीपत्रांचा वापर करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच झोपड्यांना आग लावण्यात आली. मात्र इतका कालावधी उलटूनही पोलिसांनी ना गुन्हा दाखल केला, ना अटक केली. (Marathi Batmya)
सीताबाई धोंडे यांच्यावर दुहेरी आघात झाला आहे. आगीत घर जळाले आणि त्या धक्क्यातून दत्तू आणि सोमनाथ या दोन मुलांचा मृत्यू झाला. “हे सरकार गरीबांचे आहे की बिल्डरांचे?” असा सवाल करत त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. या घटनेमुळे यशवंत स्टेडियम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास संघटनेचे शिष्टमंडळ सचिवालयात चर्चेसाठी गेल्यानंतर परिस्थिती काहीशी शांत झाली.







