PM Kisan Samman Nidhi: बिहारच्या निवडणूका निकाल जाहिर होताच, केंद्र सराकरने एक महत्त्वाची घोषणा केली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेसंदर्भात 21 व्या हप्ताबद्दल माहिती दिली आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्या लवकर येणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा आनंदाचा क्षण ठरला आहे. स्थगित ठेवलेला हप्ता आता येत्या 19 नोव्हेंबर बुधवारी थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.

या हप्त्याचे लाभार्थी कोण ?
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, २१ वा हप्ता मिळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रे तसेच नोंदी वेळेत अपडेट करणे आवश्यक आहे. जर कोणत्याही लाभार्थ्याने वेळोवेळी केवायसीची नोंद किंवा चूकीचा तपशील व कागदपत्रे बॅंकेत दिली असेल तर त्याला येणारा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर केवायई पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
ई-KYC अनिवार्य
पीएम किसान योजनेमध्ये लाभार्थ्यांना ई-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-KYC अपडेट नसल्यास तुमचा हप्ता मिळण्यास अडचण होऊ शकते.
बँक खात्याची खात्री
-
आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेला आहे का?
-
खाते सक्रिय (active) आहे का?
-
IFSC कोडमध्ये बदल झालेला आहे का?
ही माहिती शेतकऱ्यांनी तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जमिनीच्या नोंदींची पडताळणी
लाभार्थी शेतकऱ्याचे नाव सातबारा किंवा इतर जमीन दस्तावेजांमध्ये योग्यरीत्या नोंदवलेला असायला पाहिजे. जर तो चुकीची प्रकारे नोंदवला असल्यास आपला हप्ता रोखला जाऊ शकतो.
सरकारच्या माहितीनुसार, कागदपत्रे योग्य असल्यास शेतकऱ्यांना Rs 2000 चा 21 वा हप्ता कोणत्याही विलंबाशिवाय मिळणार आहे.
आपल्या खाते अशा प्रकारे करा चेक
Step 1: अधिकृत वेबसाइटला भेट द्या
pmkisan.gov.in या अधिकृत पोर्टलवर जा.
Step 2: ‘Beneficiary Status’ निवडा
होमपेजवर असलेल्या ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करा.
Step 3: आवश्यक माहिती भरा
आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी कोणताही तपशील भरून पुढे जा.
Step 4: ‘Get Data’ वर क्लिक करा
त्यानंतर स्क्रीनवर तुमचा हप्ता जमा झाला आहे का, अर्जाची स्थिती आणि पात्रतेची माहिती दिसेल.





