पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Pimpri-Chinchwad News) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुन्हेगारांविरोधात (Pune News) मोठी मोहीम सुरू केली आहे. चऱ्होली येथे (Nitin Gilbile Murder) व्यावसायिक नितीन गिलबिले यांच्या खुनाच्या प्रकरणात फरार (Pune Crime) असलेल्या माजी नगरसेवक किसन उर्फ महाराज तापकीर (Kisan Maharaj Tapkir) याच्यासह सात जणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक वादातून नितीन गिलबिले यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून तापकीर हा फरार आहे. दिघी पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार या सातही आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई झाली असून त्यांच्यावर एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील आरोपींमध्ये अमित जीवन पठारे, विक्रांत सुरेश ठाकूर, सुमित फुलचंद पटेल, आकाश सोमनाथ पाठारे, सोमनाथ प्रकाश पाटोळे आणि किसन तापकीर यांचा समावेश आहे. (Breaking News)

टोळीवर 15 गंभीर गुन्ह्यांची नोंद
दिघी पोलिसांनी आणखी एका गुन्हेगारी टोळीवरही मकोका लावण्याचा प्रस्ताव पाठवला होता. विक्रांत उर्फ सरडा प्रकाश देवकुळे, सुरज राजू चव्हाण, साहिल उर्फ विश्वास लोट, शुभम सुमित डिंगीया या बोपखेलमधील युवकांच्या टोळीवर सात गंभीर गुन्हे दाखल असून या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चिखली परिसरातील अनिरुद्ध उर्फ बाळ्या उर्फ विकी जाधव याच्या टोळीवरही मकोका लावण्यात आला आहे. या टोळीत विकी जाधव, सोहन चंदेलिया, प्रद्युमन जवळगे, यश उर्फ गोंद्या खंडागळे, अभिषेक पवार, शुभम चव्हाण, अनिकेत बाराथे, अश्विन गायकवाड, यशपालसिंग देवडा आणि पाच अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या टोळीवर एकूण 15 गंभीर गुन्हे नोंद आहेत. (Marathi News)
पोलिसांची कडक कारवाई
एमआयडीसी भोसरी परिसरातील राहुल लोहार यांच्या टोळीवरही मकोका कारवाई झाली आहे. राहुल लोहार, हृतिक गायकवाड, आकाश गायकवाड, गणेश वहिले आणि शिवतेज ठाकरे यांच्यावर एकूण 10 गंभीर गुन्हे दाखल आहेत. चालू वर्षात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 35 गुन्हेगारी टोळ्यांमधील 179 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली असून वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे.







