लोणी काळभोर: यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ (Nikhil Randive) पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या (Yavat News) त्रासाला कंटाळून आत्महत्या करत (Pune News)असल्याची सुसाईड नोट लिहून मागील सहा दिवसांपासून गायब झालेले पोलीस कर्मचारी निखिल रणदिवे अखेर त्यांच्या घरी बुधवारी (ता.10) रात्री परतले आहेत. याला शिक्रापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांनी पुष्टी दिली आहे. तर निखिल रणदिवे हे घरी सुखरूप पोहचल्याने त्याच्या कुटुंबामध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

निखिल रणदिवे यांनी बेपत्ता होण्यापूर्वी एक पोस्ट सोशल मिडीयावर टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी थेट यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांचे नाव नमूद केले होते. रणदिवे यांनी स्पष्टपणे लिहिले होते की, देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहेत. ही पोस्ट व्हायरल झाली आणि त्यानंतर लगेच त्यांनी व्हॉट्सअॅपवर स्टेटसही पोस्ट केले. काही क्षणातच रणदिवे त्यांच्या घरातून अचानक बेपत्ता झाले. हे आरोप अत्यंत गंभीर होते, कारण ते थेट एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर आणि पोलीस दलातील अंतर्गत कारभारावर बोट ठेवणारे होते. (Marathi News)
एका पोलीस कर्मचाऱ्यानेच वरिष्ठांवर असा आरोप करून बेपत्ता होणे, ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. पोलीस दलात तर मोठी खळबळ उडाली होती. निखिल रणदिवे यांच्या भावाने त्यांची बेपत्ता झाल्याची तक्रार शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली. रणदिवे यांच्या जीवाला धोका आहे, या भीतीने त्यांचे कुटुंब पूर्णपणे चिंतेत बुडाले होते. घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने त्वरित हालचाली सुरू केल्या. यवत पोलीस, शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची एक संयुक्त टीम रणदिवे यांचा शोध घेण्यासाठी कामाला लागली. पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या सहकाऱ्याला सुरक्षित परत आणण्यासाठी दिवस-रात्र एक करत होते. (Marathi Batmya)
पोलीस दलासाठी, रणदिवे यांच्या कुटुंबीयांसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हे सहा दिवस एका युगासारखे होते. प्रत्येक क्षण चिंतेचा, प्रत्येक फोनची रिंग भीतीची होती. या काळात अनेक तर्कवितर्क लावले गेले. रणदिवे खरंच आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतील का? ते कुठेतरी लपले आहेत का? त्यांच्यावर खरंच इतका अन्याय झाला होता का? हे सर्व प्रश्न अनुत्तरित होते आणि संपूर्ण पोलीस प्रशासनावर एक प्रकारचा दबाव वाढत होता. निखिल रणदिवे हे सुखरूप परतण्याची सर्वांना प्रतीक्षा होती.
दरम्यान, निखिल रणदिवे हे बुधवारी (ता.10) मध्यरात्री सुरक्षितपणे घरी परतले आहे मात्र, ही घटना इथेच संपत नाही. रणदिवे यांच्या परतण्याने एका प्रकरणावर पडदा पडला असला तरी, अनेक नवीन आणि मोठे प्रश्न आता उभे राहिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यन्निओ वरिष्ठांचे आदेशही पायदळी तुडवले आहेत, असाही गंभीर आरोप रणदिवे यांनी केला आहे. पोलीस दलात शिस्त आणि वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट मानली जाते. जर वरिष्ठ अधिकारीच स्वतःच्या वरिष्ठांचे आदेश मानत नसतील, तर त्या पोलीस ठाण्यात किंवा विभागात शिस्त कशी टिकणार? ही बाब थेट प्रशासकीय नियमांचे उल्लंघन करणारी असून, यामुळे पोलीस दलातील विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो.
प्रशासनाची भूमिका पुढील काही दिवसांत दिसून येईल?
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर थेट आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप निखिल रणदिवे यांनी केला आहे. पोलीस प्रशासनकडून देशमुख यांच्यावर काय कारवाई होणार? की पुन्हा तेच ‘जैसे थे’ वातावरण चालू राहणार? प्रशासनासमोर आता मोठी कसोटी आहे. एका बाजूला आपल्या कर्मचाऱ्याच्या तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलीस दलाची प्रतिमा जपण्याचे आव्हान असणार आहे. जनतेला या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काही दिवसांत पोलीस प्रशासनाच्या कारवाईतून स्पष्ट दिसून येतील.






