Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nanded Rain : हातातोंडाशी आलेला घास हिरावला! ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस; पुढचे ४८ तास धोक्याचे!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 23 February 2026, 20:16
Nanded Rain

photo- ppn

Nanded Rain : नांदेड जिल्ह्यातील हवामानाने गेल्या दोन दिवसांत अचानक कलाटणी घेतली असून, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेण्याची भीती निर्माण केली आहे. विशेषतः किनवट तालुक्यात सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह झालेल्या जोरदार पावसामुळे रब्बी पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरत असल्याने पुढील काही दिवसांविषयीची चिंता आणखी वाढली आहे.

 

रविवारी रात्री उशिरापर्यंत पावसाने हजेरी लावली आणि सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास पुन्हा जोरदार सरी कोसळल्या. सध्या हरभऱ्याची काढणी ऐन जोमात सुरू आहे, तर गहू, ज्वारी आणि मका ही पिके अंतिम टप्प्यात आहेत. अशा वेळी झालेल्या पावसामुळे शेतात कापून ठेवलेला हरभरा भिजला असून त्याच्या दर्जावर परिणाम होण्याची भीती आहे. ओलाव्यामुळे गव्हाचे दाणे काळवंडण्याची शक्यता आहे, तर मका पिकात पाणी साचल्यास खोड आडवे पडणे आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. गारपीट झाल्यास हरभऱ्याच्या शेंगा झडण्याची शक्यता असून उत्पादनात मोठी घट येऊ शकते. आधीच बियाणे, खत आणि मजुरीचा खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे आर्थिक फटका बसणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. काढलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवणे, ताडपत्रीने झाकणे आणि शक्य तितक्या लवकर काढणी पूर्ण करणे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. अधिकृत हवामान अंदाजावरच विश्वास ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.

आता प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी किनवटसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून जोर धरत आहे. अवकाळी पावसाचा हा तडाखा रब्बी हंगामाच्या यशावर पाणी फेरणारा ठरू नये, अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : 21 लाखांचे कर्ज, ट्रक चोरी अन् बँकेचे हप्ते; 26 वर्षीय तरुणाची ‘सुसाईड नोट’ लिहून आत्महत्या

Saturday, 4 April 2026, 12:18
Pimpari Chinchwad Crime: Saraita, who broke more than 60 houses in the city, arrested; Crime Branch Unit 1's performance

वाकडमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई; 27.75 लाखांचे एमडी जप्त, पुणे-मुंबईतील 2 तस्कर अटकेत

Saturday, 4 April 2026, 11:55
Harshwardhan Ashok Kharat

Harshwardhan Ashok Kharat : दैवी शक्तीच्या नावाखाली ‘माया’ जमवली; भोंदूबाबाच्या घरातून रोख रकमेचा पाऊस, मुलाच्या खुलाशामुळे खळबळ

Saturday, 4 April 2026, 11:39

भोंदू बाबा अशोक खरातचा 12 वा कारनामा! कांदा व्यापाऱ्याला लावला चुना; ‘देवाचा कोप होईल’ म्हणत केली फसवणूक

Saturday, 4 April 2026, 11:12
Chhatrapati Shivaji Maharaj Statue

Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मराठा-धनगर समाजाच्या मध्यस्थीने अंजनगावात शांतता; शिवरायांचा पुतळा नवीन जागेवर सन्मानाने बसणार

Saturday, 4 April 2026, 11:08

काळाचा भीषण घाला! नीरा कालव्यात कार कोसळून तिघांचा दुर्दैवी अंत; चालक सुदैवाने बचावला

Saturday, 4 April 2026, 10:37
Next Post
Crime

Crime : "लेकराला चांगलं सांभाळ, मी जातोय..." 2 महिन्यांच्या लेकीला पाहण्यासाठी आसुसलेले डोळे कायमचे मिटले! तरुणाने गळफास घेऊन संपवलं आयुष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.