Sunday, March 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai : महिला कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता कामाच्या ठिकाणी छळ करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचलले मोठे पाऊल.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 March 2026, 19:59
Mumbai

photo- social media

Mumbai: कामाच्या ठिकाणी नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम, 2013, म्हणजेच PoSH Act, कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबवला जातो आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी राज्यभरात PoSH Audit करण्याचे महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. हे आदेश महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Women) अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना दिले आहेत.

या निर्देशांनुसार, येत्या 30 दिवसांत राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, स्वायत्त संस्था आणि खाजगी कार्यालयांमधील अंतर्गत तक्रार समित्यांचे (Internal Committee – IC) सखोल परीक्षण करण्यात येणार आहे. PoSH Act नुसार प्रत्येक कार्यालयात सक्षम आणि कार्यरत अंतर्गत समिती असणे बंधनकारक आहे. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती (Local Committee – LC) कार्यरत असणेही आवश्यक आहे.

मात्र राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारी, अहवाल आणि राज्यभरातील दौर्‍यांदरम्यान एक गंभीर वास्तव समोर आले आहे. अनेक कार्यालयांमध्ये अंतर्गत समितीच अस्तित्वात नाही. काही ठिकाणी समिती केवळ कागदावर असून प्रत्यक्ष कामकाज होत नाही. सदस्यांना कायद्याचे प्रशिक्षण नाही, वार्षिक अहवाल सादर केले जात नाहीत, कर्मचाऱ्यांमध्ये जागृती नाही आणि कार्यालयाच्या दर्शनी भागात आवश्यक माहितीचे फलकही लावलेले नाहीत. यामुळे महिलांनी तक्रार करायची तरी कुठे आणि कशी, हा प्रश्न निर्माण होतो.

या पार्श्वभूमीवर, आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की प्रत्येक कार्यालयाने IC Audit Report तयार करावा. या अहवालात समितीची रचना, स्थापनेचा आदेश, प्राप्त व प्रलंबित तक्रारी, त्यावरील कार्यवाही, निर्णयांची अंमलबजावणी, वार्षिक अहवाल, जनजागृती उपक्रम आणि दर्शनी फलक यांचा तपशील असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी समिती स्थापन झालेली नाही किंवा अपूर्ण आहे, तेथे तात्काळ समिती स्थापन करावी, अन्यथा कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

या निर्णयाचे महत्त्व मोठे आहे. कारण राज्यात मोठ्या प्रमाणावर महिलांचा कामगार वर्ग विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. सुरक्षित, निर्भय आणि सन्मानजनक कामाचे वातावरण मिळते आहे की नाही, याची ही तपासणी आहे. रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, PoSH Audit सक्तीचे करण्याची मागणी आयोगाने केली होती आणि शासनाने August 22, 2025 रोजी याबाबत शासन निर्णय जारी केला. आता या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कशी होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Mumbai

Mumbai : महिला कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता कामाच्या ठिकाणी छळ करणाऱ्यांची खैर नाही; सरकारने उचलले मोठे पाऊल.

Sunday, 1 March 2026, 19:59
Uruli Kanchan

Uruli Kanchan : पुणे – सोलापूर महामार्गावरील प्रयागधाम फाट्यावर ट्रक, टँकर व कंटेनरचा विचित्र अपघात ; कंटेनर चालकावर गुन्हा दाखल..

Sunday, 1 March 2026, 18:49
Dound

Dound : दौंड तालुक्यात रस्त्याच्या वादातून वकिलाला मारहाण, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

Sunday, 1 March 2026, 18:40
Uruli Kanchan

Uruli Kanchan : कुंजीरवाडी येथील व्यक्तीचा सोरतापवाडीत अपघाती मृत्यू

Sunday, 1 March 2026, 18:22
Accident

Accident : होळीचा रंग रक्ताने माखला! बाजारात रंग खरेदीला निघालेल्या ३ अल्पवयीन मित्रांचा करुण अंत.

Sunday, 1 March 2026, 18:14
Gold Silver Rate

Gold Silver Rate : सुवर्ण बाजारात आजवरची सर्वात मोठी उलथापालथ! एका रात्रीत सोन्या – चांदीचे भाव गगणाला भिडले; काय आहेत आजचे भाव? वाचा

Sunday, 1 March 2026, 17:12
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.