Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai : पगार निम्मा अन् हप्ताच मोठा! मुंबईत घर घेणं पडतंय सर्वात महाग; नोकरदारांच्या पगारातील ४७% हिस्सा फक्त EMI मध्येच साफ!”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 28 December 2025, 13:58
Mumbai

photo- social media

Mumbai : स्वतःचं घर असावं, हे स्वप्न प्रत्येकाचंच असतं. पण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत हे स्वप्न पूर्ण करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. सध्या मुंबईत घर घेणं म्हणजे सामान्य नोकरदारांसाठी मोठं आर्थिक ओझं ठरत आहे. कारण घरासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यातच त्यांच्या पगाराचा तब्बल निम्मा हिस्सा खर्ची जात आहे. (Mumbai)

 

नाइट फ्रँक इंडियाच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, मुंबईत घर घेणाऱ्या नोकरदाराला आपल्या मासिक उत्पन्नाच्या जवळपास 47 टक्के रक्कम फक्त ईएमआयमध्ये द्यावी लागते. त्यामुळे मुंबईत घर घेणं देशात सर्वात महागडं ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नाइट फ्रँक इंडियाने देशातील मोठ्या शहरांचा ‘अफोर्डेबिलिटी इंडेक्स’ जाहीर केला असून, यात घराच्या कर्जहप्त्यावर पगाराचा किती टक्का खर्च होतो, याचा अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालात मुंबई पहिल्या क्रमांकावर असून, इथे घर घेणं सर्वात कमी परवडणारं असल्याचं दिसून आलं आहे.

इतर शहरांशी तुलना केली, तर दिल्लीत हा खर्च 28 टक्के आहे, बंगळुरूमध्ये 27 टक्के, चेन्नईत 23 टक्के, पुणे आणि कोलकात्यात 22 टक्के, हैदराबादमध्ये 18 टक्के, तर अहमदाबादमध्ये फक्त 8 टक्के आहे. म्हणजेच अहमदाबादमध्ये घर घेणं सर्वात सोपं, तर मुंबईत सर्वात कठीण ठरत आहे.

मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे नोकरी, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधींसाठी देशभरातून लोक इथे येतात. त्यामुळेच इथे घरांची मागणी कायम जास्त आहे. वाढती मागणी आणि मर्यादित जागा यामुळे घरांच्या किमती दरवर्षी नवे उच्चांक गाठत आहेत.

मुंबईत घर महाग होण्यामागे अनेक कारणं आहेत. जमिनीचे गगनाला भिडलेले दर, सरकारी प्रीमियम आणि विविध शुल्क, सिमेंट-स्टीलच्या वाढत्या किमती, बांधकाम मजुरांची मजुरी आणि गृहकर्जावरचे जास्त व्याजदर – या सगळ्यांचा थेट परिणाम घरांच्या किमतींवर होत आहे.

खासगी बिल्डरची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना, म्हाडाची घरे तुलनेने स्वस्त असल्यामुळे मध्यमवर्गीयांची तिकडे जास्त पसंती आहे. त्यामुळेच दरवर्षी म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो अर्ज येतात.

तज्ज्ञांच्या मते, पुढील काही वर्षांत मुंबईबाहेरच्या भागांमध्ये रस्ते, रेल्वे आणि इतर सुविधा वाढल्या, तर लोक मुंबईबाहेर घर घेण्याकडे वळतील. त्यामुळे मुंबईवरील ताण काहीसा कमी होईल. मात्र घरांच्या किमती खऱ्या अर्थाने नियंत्रणात यायला अजून किमान 15 ते 20 वर्षांचा कालावधी लागेल, असं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post

स्वप्न पूर्ण करण्याचं सीक्रेट! 2026 मध्ये श्रीमंत व्हायचंय? आजच बनवा हा 'मॅनिफेस्टेशन बोर्ड'; जाणून घ्या योग्य पद्धत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.