पुणे : पवार कुटुंबामध्ये सध्या सनई-चौघडे वाजताना दिसत असून, एकापाठोपाठ एक येणाऱ्या लग्नकार्यांमुळे घरात आनंदाचे वातावरण आहे. नुकताच खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचा विवाहसोहळा संपन्न झाला. हा आनंद ओसरतो न ओसरतो तोच, आता पवार परिवारात पार्थ पवार आणि कायनात धार यांचा साखरपुड्याचीं जय्यत तयारी सुरु आहे.पार्थ यांच्या साखरपुड्याची माहिती देतानाच सुप्रिया सुळे यांनी एक मोठा सस्पेन्सही निर्माण केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी असे म्हटले आहे कि, पवार कुटुंबात लवकरच आणखी एक गोड बातमी ऐकायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही नवी आनंदवार्ता नक्की काय असणार, याबद्दल आता सर्वांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.तसेच “आमच्या कुटुंबात सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. आधी युगेंद्र, मग जय, त्यानंतर रेवती आणि आता पार्थचा नंबर आहे. यंदाच्या वर्षी लग्नाचा बँड वाजवायचाच असं मुलांनी ठरवलेलं दिसतंय.असेही त्या म्हणाल्या.

गेल्या ६ महिन्यांत पवार कुटुंबात तीन मोठे विवाह सोहळे पार पडले आहेत. यामध्ये युगेंद्र पवार, त्यानंतर अजित पवारांचे दुसरे चिरंजीव जय पवार आणि गेल्या महिन्यात रेवती सुळे यांचा विवाह संपन्न झाला. आता पार्थ यांच्या रूपाने घरात चौथ्या शुभकार्याची तयारी सुरू झाली आहे.
दिवंगत अजित पवार यांचे सुपुत्र आणि खासदार पार्थ पवार हे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांचा कायनात धार यांच्यासोबत २९ जुलै रोजी पुण्यात साखरपुडा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विशेष सोहळ्यासाठी दोन्ही कुटुंबांकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला राजकारण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.







