लोणी काळभोर, ता. 15: दुबईमधून भारतात लवकर परत येणार नाहीत याचा फायदा घेऊन डॉक्टर महिलेच्या फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करून तो फ्लॅट बळकाविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (लोणी काळभोर, ता. हवेली) (LONI KALBHOR CRIME) ग्रामपंचायत हद्दीतील दुय्यम निबंधक कार्यालय, हवेली क्र.6 येथे सन 2022 पासून ते दिनांक 13 नोव्हेबर 2025 यादरम्यान घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात वकिलासह 6 जणांवर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलीम शेख (रा. कोंढवा पुणे), इरफान खादरसाब नदाफ, अॅड. नईम नजीर तांचोळी, सईद नजीर शेख, एक अनोळखी महीला व पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रेहाना मोहंमद मोबीन शेख (वय 50, रा. सध्या फलॅट नं.4, बी बिल्डींग, कुमार गॅलेक्सी सोसायटी, 382/2 भवानी पेठ पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा: पुण्यात भीषण अपघात! बस-मेट्रो पिलर आणि ट्रकची धडक, मध्यरात्री शिवाजीनगरात नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेहाना मोहंमद मोबीन शेख या पेशाने डॉक्टर आहेत. त्या कुटुंबासोबत दुबईत राहतात. त्यांचा पुण्यातील भवानी पेठत 1200 स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे. रेहाना शेख या त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त बेंगलुरु येथे असताना त्यांना मोबाईलवर पुणे महानगरपालिकेकडून डीअर टॅक्स प्लेयर रिसीव्ह युवर पेमेंट 98 हजार 23 रुपये अगेन्स्ट F/2/17/0278100 थँक्यू प्रॉपर्टी टॅक्स पीएमसी असा मेसेज आला. परंतु, कामाच्या गडबडीत रेहाना शेख या तो मेसेज विसरून गेल्या होत्या.
दरम्यान, रेहाना शेख यांना 10 ऑक्टोंबर 2025 रोजी पुन्हा पुणे महानगरपालिकेचा पुन्हा मेसेज आला. त्यामध्ये डीअर टॅक्स प्लेयर रिसीव्ह युवर पेमेंट 3 हजार 510 रुपये अगेन्स्ट टायटल ट्रान्स्फर F/2/17/02781000 थँक्यू प्रॉपर्टी टॅक्स पीएमसी असा मजकुर लिहिलेला आणखी एक टेक्स्ट मैसेज आला होता. त्यामुळे रेहाना शेख यांनी या मेसेजच्या बाबतीत त्यांच्या ओळखीच्या वकिलांना चौकशी करायला सांगितली. तेव्हा सर्च रिपोर्ट मध्ये फ्लॅटचे नव्याने रजिस्ट्रेशन झालेचे दिसुन आले.
वरील सहाही जणांनी खोटी कागदपत्रे तयार केली आहेत. आणि या बनावट कागदपात्रांच्या आधारे पॉवर ऑफ अॅटर्नी करून घेतली आहे. सर्व आरोपींनी संगनमत करून फ्लॅट बळकाविण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी फिर्यादी तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार सहाही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 338, 336 (3),340(2),318(4), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव करत आहेत.
हेही वाचा: पुणेकरांनो घराचा दरवाजा चुकूनही उघडा ठेवू नका अन्यथा महागात पडेल; नेमकं प्रकरण काय? वाचा





