Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur News: चहा दुकानात बनावट नोटा छपाई, पोलीस हवालदारच रॅकेटचा सूत्रधार, एक कोटींच्या खोट्या नोटा जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 11 October 2025, 21:12
Kolhapur News: Fake notes printed in tea shop, police constable is the mastermind of the racket, fake notes worth one crore seized

Photo-Social Media

कोल्हापूर : पोलिस दलातील एका (Kolhapur News) हवालदाराच्या चहा दुकानातच बनावट नोटा (Kolhapur Crime) छपाईचे मोठे रॅकेट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिरज शहरातील गांधी चौक पोलिसांनी केलेल्या गुप्त तपासातून तब्बल 1 कोटी रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आले असून, कोल्हापूर पोलिस दलातील हवालदारासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या मोठ्या बनावट नोटा टोळीचे जाळे उघड झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, 8 ऑक्टोबर रोजी मिरज-कोल्हापूर रस्त्यावरील नीलजी बामणी पुलाजवळ एक व्यक्ती बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या पथकाने छापा टाकत सुप्रीत काडापा देसाई याला 42 हजार रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केली. चौकशीदरम्यान या नोटांची छपाई कोल्हापूर पोलिस दलातील वाहन चालक हवालदार इब्रार इनामदार यांच्या “सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहा” या दुकानात होत असल्याचे उघड झाले.

कसबा बावड्यातील या दुकानात झेरॉक्स मशीन, कलर प्रिंटर आणि पेपर कटरच्या साहाय्याने बनावट नोटांची छपाई केली जात होती. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून 500 आणि 200 रुपयांच्या नोटांसह तब्बल 1 कोटी रुपये किंमतीच्या बनावट नोटा, नोटा मोजायचे मशीन, स्कॅनर, प्रिंटर आणि एक चारचाकी वाहन असा एकूण 1 कोटी 11 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यामध्ये मुख्य सूत्रधार इब्रार आदम इनामदार, सुप्रीत काडापा देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे आणि मुंबईतील सिद्धेश म्हात्रे यांचा समावेश आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात हे बनावट नोटांचे वितरण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. संशयित आरोपी प्रत्येक 500 रुपयांच्या खऱ्या नोटेच्या बदल्यात तीन बनावट नोटा पुरवत असल्याचेही पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आणखी काही संशयितांच्या शोधासाठी पोलिस पथके कार्यरत आहेत. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून, गांधी चौक पोलिस पथकाचा विशेष गौरव करण्यात आला आहे. दोषींवर कठोर कारवाई होईल, असे आश्वासन पोलिस अधीक्षकांनी दिले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Rohit Pawar: Chief Minister's name 'Ghaywal' mentioned in campaign meeting; Rohit Pawar's attack while showing video

Rohit Pawar: प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांच्या तोंडी 'घायवळ'चं नाव; व्हिडीओ दाखवत रोहित पवारांचा हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.