Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची प्रकृती बिघडली; ३० हजार फुटांवर मृत्यूशी झुंज! ‘मराठी महिलेने’ वाचवला जीव

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 15 December 2025, 21:35
kolhapur

photo- social media

Kolhapur : गोवा येथून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या (6E 2091) विमानात तब्बल ३० हजार फूट उंचीवर एका अमेरिकन महिला प्रवाशाचा जीव धोक्यात आला होता. चारही बाजूंनी बंद दरवाजे, कोणतेही वैद्यकीय उपकरण नाही आणि मदतीसाठी रुग्णालय नाही, अशा गंभीर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत, बेळगाव जिल्ह्यातील खानापूरच्या माजी आमदार आणि काँग्रेस नेत्या डॉ. अंजली निंबाळकर (Dr. Anjali Nimbalkar) या देवदूतासारख्या धावून आल्या. त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ३४ वर्षांच्या अमेरिकन महिला प्रवाशाचे प्राण वाचले. डॉ. अंजली निंबाळकर या कोल्हापूरचे सुपूत्र आणि कर्नाटकचे आयपीएस अधिकारी हेमंत निंबाळकर यांच्या पत्नी आहेत. (Kolhapur)

 

गोव्याहून उड्डाण घेताच थरार

गोव्याहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानात उड्डाणानंतर काही क्षणांतच ‘HELP’ असा आक्रोश घुमला. ३४ वर्षांची अमेरिकन महिला प्रवासी बसल्या जागेवरच कोसळली. तिचे शरीर थंड पडले होते, हाताची नाडी जवळपास थांबली होती आणि श्वास घेण्याची क्षमता क्षीण होत चालली होती. विमानात भीती आणि गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. कुठलीही वैद्यकीय साधने नसतानाही, डॉ. अंजली निंबाळकर जागेवरून उठल्या आणि त्यांनी क्षणाचा विलंब न लावता सीटवरच कार्डिओपल्मोनरी रेसुसिटेशन (CPR) सुरू केला. प्राथमिक उपचाराने काही मिनिटांतच त्या महिलेला शुद्ध आली. मृत्यूला हरवून जीवन परतले, असेच ते क्षण होते.

दीड तास मृत्यूच्या दारात आणि युद्धपातळीवर प्रयत्न

त्या महिलेने पोटाच्या तक्रारीमुळे दोन दिवसांपासून अन्न घेतले नव्हते, तसेच तिने उड्डाणापूर्वी औषधे घेतल्याचे समोर आले होते. एकदा शुद्धीवर आलेली ती महिला काही वेळातच पुन्हा मृतासारखी शांत झाली. शरीर थंड आणि निळसर पडले, बोलण्याची शक्ती संपली. विमान उतरण्यास अजून दीड तास बाकी होता. मात्र, अंजली निंबाळकरांनी हार मानली नाही. त्यांनी मोकळ्या सीटवर पुन्हा एकदा, तब्बल १५ ते २० मिनिटे मृत्यूशी दोन हात करत उपलब्ध मर्यादित साधनांमध्ये तिचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली. अखेर हाताची नाडी पुन्हा सुरू झाली, रक्तदाब मोजण्यात आला आणि शरीरात पुन्हा उष्णता निर्माण झाली. महिलेच्या बहिणीने आशा सोडली असतानाही, डॉ. अंजली निंबाळकरांनी तिला मृत्यूच्या दारातून परत आणले.

दिल्लीत तातडीची व्यवस्था

संपूर्ण उड्डाणभर, जवळपास अडीच तास डॉ. अंजली निंबाळकर त्या महिलेजवळ उभ्या होत्या आणि त्यांनी आवश्यक ते प्राथमिक उपचार सुरूच ठेवले. दरम्यान, इंडिगोचे विमान कर्मचारी आणि वैमानिक यांनी तातडीने दिल्ली विमानतळावर रुग्णवाहिका, डॉक्टर आणि प्रायोरिटी लँडिंगची व्यवस्था केली. विमान जमिनीवर उतरताच महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅलिफोर्नियाची रहिवासी असलेल्या ‘जेनी’ नावाच्या या महिलेचे प्राण वाचवल्यामुळे डॉ. अंजली निंबाळकर यांच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45

विद्यापीठात विद्यार्थिनीच असुरक्षित? ABVP च्या आंदोलनाने वातावरण तापलं; सुरक्षा व्यवस्थेवर उठले गंभीर प्रश्न!

Thursday, 2 April 2026, 14:15
Next Post
Latur

Latur : 'त्याने' इन्शुरन्सचे पैसे हडपण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; निरपराध वृद्धाचा घेतला जीव! पोलीस तपासात समोर आलेली 'फिल्मी स्टोरी' ऐकून बसेल हादरा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.