Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Indapur News: तक्रारवाडी शाळेच्या वर्गखोल्यांवरून मतभेद; माजी विद्यार्थ्यांकडून आंदोलनाचा इशारा  

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Thursday, 11 December 2025, 15:05
Indapur News: Disagreements over the classrooms of Takrarwadi school; former students threaten to protest.

Photo- Pune Prime News , Takrarwadi School

भिगवण: तक्रारवाडी (ता. इंदापूर) (Indapur News) जिल्हा परिषद शाळेत मंजूर बारा वर्गखोल्यांच्या बांधकामासंदर्भातील घडामोडी गावभर चर्चेचा विषय बनल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अधिकृत बैठकीनंतर भिगवणमधील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा जोर धरत आहे. या बैठकीत शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना एकेकट्याने बोलावून बारा वर्गखोल्यांऐवजी आठच खोल्या का योग्य आहेत, हे समजावून सांगितल्याचे बोलले जात आहे. या एकांत चर्चेमुळे गावकऱ्यांच्या मनात संशयाचे ढग दाटले असून, “यात काहीतरी गुप्त हेतू दडलेला आहे” अशी कुजबुज कट्ट्याकट्ट्यावर रंगत आहे.

 

गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय

शालेय व्यवस्थापन समितीमध्ये एकमत दिसून येत नाही. बारा वर्गखोल्या उभारण्याची मंजुरी असूनही आठ खोल्यांच्या प्रस्तावावर मतभेद स्पष्टपणे पहायला मिळत आहेत.  काही सदस्य बारा खोल्यांवर ठाम राहतात, तर काही आठ खोल्यांवर.  या मतभेदामुळे समितीतील निर्णय प्रक्रियेवर परिणाम होत आहे.  शाळेच्या विकासकामांचा वेग आणि पारदर्शकता यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिणामी, आठ आणि बारा वर्गखोल्यांच्या मुद्द्यावर समितीतील मतभेद गावकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनत चाललेला दिसुन येत आहे.

ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

मंजूर बारा वर्गखोल्यांऐवजी आठ खोल्यांचे टेंडर काढण्यामागे कनिष्ठ अभियंत्याचे म्हणणे, निधी अपुरा पडेल, असे कारण असले तरी, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांकडून पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  शाळेचे माजी विद्यार्थी अमोल कांबळे यांनी ठाम भूमिका घेत, “बारा मंजूर खोल्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही; अन्यथा शाळेसमोर आंदोलन उभे करू” असा इशारा दिला आहे.

पालकांचे म्हणणे काय?

काही पालकांचे म्हणणे आहे की, जर आत्ताच शाळेला बारा वर्गखोल्या मिळाल्या, तर सर्व विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळेल; आठ खोल्यांमध्ये ही सोय अपुरी पडेल आणि भविष्यात हीच समस्या पुन्हा उभी राहण्याची शक्यता आहे. पालकांनी यावर भर देत एकदाच बारा वर्गखोल्या मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, आणि कोणीही मलिदा न खाता, गरीब मुलांच्या शिक्षणाच्या भवितव्याचा विचार करून सुंदर, सक्षम इमारत उभी करण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे.

संपूर्ण गावकऱ्यांमध्ये आठ खोल्यांच्या प्रस्तावावर असंतोषाचे सूर वाढत असून, गावातील पालक, तरुण आणि माजी विद्यार्थी बारा खोल्यांच्या मुद्द्यावर एकवटत असल्याचे दृश्य स्पष्ट होत आहे. आगामी बैठकीत हा तिढा सुटतो का, शाळेच्या विकासकामांना गती मिळते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
Pune News: 'This is Baburao's style'! Ajit Pawar group's big leader's exploits in Pune; Storm over pipeline dispute

Pune News: 'ये बाबुराव का स्टाईल है रे'! पुण्यात अजित पवार गटाच्या बड्या नेत्याचा कारनामा; पाईपलाईनच्या वादातून तुफान राडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.