Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

किती सोसायचं?दारुड्या पतीचा रोजचा त्रास अन् अखेर टोकाचं पाऊल! बीडमध्ये 30 वर्षीय शीतलच्या घटनेने खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 20 October 2026, 10:51

बीड : अंबाजोगाई तालुक्यातील परळीवेस परिसरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पतीच्या दारूच्या व्यसनाला आणि सततच्या शारीरिक-मानसिक त्रासाला कंटाळून एका 30 वर्षीय शीतल बापूराव लोंढे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पती बापूराव भगवान लोंढे याच्या विरोधात परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतलचा विवाह 2020 मध्ये बापूरावसोबत झाला होता. हे दोघेही ऊसतोडीचे काम करून आपला संसार चालवत होते. लग्नानंतर काही काळ त्यांचा संसार अगदी सुरळीत चालला होता. परंतु, पतीला दारूचे व्यसन जडल्यामुळे त्यांच्या आयुष्यात वाद सुरू झाले. बापूराव रोज दारू पिऊन घरी यायचा आणि शुल्लक कारणांवरून शीतलशी भांडण करायचा. या रोजच्या कलहामुळे घरात सतत तणावाचे वातावरण राहत होते.

दरम्यान 17 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बापूराव नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी परतला. आल्याबरोबर त्याने शीतलसोबत पुन्हा वाद घातला. काही वेळाने वाद मिटल्यानंतर दोघेही झोपायला गेले. परंतु, रात्री उशिरा घरातून अचानक रडण्याचा आवाज आल्याने शेजाऱ्यांना व नातेवाइकांना शंका आली. त्यांनी तातडीने घरात जाऊन पाहिले असता, शीतलने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

पत्नीच्या मृत्यूनंतर शीतलच्या माहेरच्या लोकांनी पतीच्या सततच्या छळाला व मारहाणीला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला. या प्रकरणी मृताच्या काकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, संभाजीनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका होतकरू तरुण जोडप्याचा असा दुर्दैवी अंत झाल्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

92 लाख शेतकऱ्यांचे 4,000 अडकले! नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष…

Wednesday, 21 October 2026, 12:59

एमआयटी गुरुकुलच्या जलतरणपटूंची जिल्हास्तरीय स्पर्धेत पदकांची लयलूट!

Wednesday, 21 October 2026, 12:20

मोठी बातमी! भाजपच्या युवा मोर्चात महाराष्ट्राचा दबदबा; 3 नेत्यांवर राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

Wednesday, 21 October 2026, 11:58

“हॉटेल बंद झालंय” म्हणताच 5 तरुणांचा संताप अनावर! जेवत्या ताटावरच मुळशीत धक्कादायक राडा,कामगारांसमोरच कृत्य..

Wednesday, 21 October 2026, 11:43

“मला कोपऱ्यात कुणी टाकलं?”; भाषणानंतर उपमुख्यमंत्री शिंदे आयोजकांवर संतापले!

Wednesday, 21 October 2026, 11:26

शिंदवणे घाटात थरार! टेम्पोचे ब्रेक फेल, चालक केबिनमध्ये अडकला; बचावकार्याला वेग..

Wednesday, 21 October 2026, 11:18
Next Post

टोल नाके इतिहासजमा होणार? थेट सॅटेलाइटद्वारे टोल वसुलीचा प्लॅन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp