Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गुडन्यूज : तुमचे ‘या’ चार बॅंकामध्ये ‘एफडी’ आहेत का? एकाच दिवसात वाढवले व्याजदर…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 21 August 2022, 9:20
Swabhimani shetkari sanghatana agitation against bank notice for loan recovery
पुणे :  खासगी आणि सरकारी बँकां ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ करताना दिसत आहेत. व्याजदर वाढल्यामुळे एकीकडे कर्जे महाग होत असली तरी मुदतठेवींवरील व्याजदर वाढत असल्यामुळे ग्राहकांना फायदा होतो आहे.
गेल्या दोन महिन्यांत रिझर्व्ह बँकेने  रेपो दरात तीन वेळा वाढ केली आहे. यानंतर बँकांमध्ये बचत योजनांवरील किंवा मुदतठेवींवरील व्याजदर (Interest rate) वाढवण्याची स्पर्धा लागली आहे. रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील व्याजदर वाढत आहेत.
एकाच दिवसात चार मोठ्या बँकांनी व्याजदर वाढवण्याची घोषणा केल्याने ग्राहकांची अधिकच चांदी झाली. मात्र, व्याजदरातील ही वाढ वेगवेगळ्या तारखांपासून लागू झाली आहे. ज्या बँकांनी व्याजदरात बदल केला आहे त्यात आयडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँक (PNB)
पंजाब नॅशनल बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. बँकेचे नवे दर 17 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. बँकेने जारी केलेल्या निवेदनानुसार, एक वर्षापासून तीन वर्षांपर्यंत आणि 5 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या मुदतीसह एफडीचा दर वाढवण्यात आला आहे. 10 वर्षांपर्यंतच्या एफडीच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.
कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank)
कोटक महिंद्रा बँकेने एफडीवरील व्याजदर 390 दिवसांवरून 3 वर्षांपर्यंत वाढवला आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होतील. बँकेने व्याजदर वाढीमध्ये 390 दिवसांपासून ते तीन वर्षांपर्यंतच्या एफडीचा समावेश केला आहे. बँकेने 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या FD साठी 2.50 ते 5.90 टक्के व्याज जाहीर केले आहे. ज्येष्ठ नागरिकांना 3 ते 6.40 टक्के व्याज मिळेल.
आयडीएफसी बँक (IDFC Bank)
इतर बँकांप्रमाणेच IDFC बँकेनेही 2 कोटींपेक्षा कमी एफडीवरील व्याजात वाढ केली आहे. नवीन दर 16 ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत. IDFC बँकेत, 2 वर्ष 1 दिवस ते 749 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 6.50 टक्के व्याज मिळेल. त्याच वेळी, 750 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 6.90 टक्के व्याज आहे. बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज दिले जाते.
एचडीएफसी बँक (HDFC Bank)
देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बॅंकेने पुन्हा एकदा व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने एफडी दरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. दोन महिन्यांपूर्वीही बँकेने एफडीवरील व्याजात वाढ केली होती. बँकेने 18 ऑगस्ट 2022 पासून नवीन दर लागू केले आहेत. बँकेने केवळ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरच व्याज वाढवले आहे. आता एक वर्ष ते दोन वर्षांच्या मुदतीच्या FD वर 5.50 टक्के व्याज मिळेल.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पार्टीचा बहाणा अन् भयानक कृत्य; डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Thursday, 2 April 2026, 17:04
New revelation in Bhondubaba Kharat case! Connection of Rupali Chakankar's sister also revealed; Transactions worth crores in sister's name?

भोंदूबाबा खरात प्रकरणात नवा खुलासा! रुपाली चाकणकरांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड; बहिणीच्या नावे कोट्यवधींचे व्यवहार?

Thursday, 2 April 2026, 16:56

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Next Post

ताम्हीणी घाटात कार कोसळून विदर्भातील तीन पर्यटकांचा मृत्यू ; तर तिघेजण जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.