Fake Currency Scam : शहर पोलिसांनी पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवत लोकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाणे शहर केला आहे. आरोपी नागरिकांकडून खरे पैसे घेत खेळण्यांच्या नोटा आणि बनावट सोन्याच्या बिस्किटांच्या माध्यमातून फसवणूक करत होते. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून लाखो रुपयांच्या बनावट वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, भिवंडीतील संजयकुमार पकौडीलाल भारती (वय 43) याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात खेळण्यातील नोटा आणि सोन्यासारखे दिसणारे 38 बनावट बिस्किट जप्त करण्यात आले. या प्रकरणात भारतीच्या चार साथीदारांची नावे समोर आली असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या भारतीला न्यायालयाने 11 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमक प्रकरण काय ?
तक्रारदार नितेश शेळके यांना एका व्यक्तीने “एक लाख रुपये द्या, त्याच्या बदल्यात तीन आठवड्यांत तीन लाख मिळतील” असे आमिष दाखवले होते. मात्र रक्कम परत न मिळाल्याने शेळके यांनी संशय घेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचला आणि आरोपीला साकेत-बाळकुम रोड परिसरातून ताब्यात घेतलं. त्यावेळी तो तक्रारदारांकडून खऱ्या नोटा घेऊन त्यांच्याजागी खेळण्यांच्या बनावट नोटा देत होता. मात्र, त्याचे साथीदार संधी साधून पसार झाले.
तपासादरम्यान आरोपीच्या घरातून पाचशे रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी 100 बंडल असे एकूण 360 बंडल सापडले. या नोटांवर फॉर स्कूल प्रोजेक्ट युज ओन्ली आणि भारतीय बच्चो का बँक अशी छपाई होती. याशिवाय सुईस्से १०० ग्रॅम फाइन गोल्ड ९९९.९ असे इंग्रजीत कोरलेली 38 बनावट सोन्याची बिस्किटे आणि फसवणुकीत वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.







