पुणे: दिग्दर्शक आदित्य धर यांचा नवीन चित्रपट ‘धुरंधर’बद्दल ट्रेलर रिलीज (Dhurandhar Movie Review) झाल्यापासून बरीच चर्चा होती. अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल आणि संजय दत्त यांच्यासारखे मोठे चेहरे यात दमदार भूमिकांमध्ये दिसत होते. हे सर्व कलाकार मुख्य नायक रणवीर सिंहसोबत काम करत असल्याने अनेकांना प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली होती. रणवीर सिंह याच्या गुप्तहेर भूमिकेबद्दलची माहिती फारशी उघड करण्यात आली नव्हती, ज्यामुळे उत्सुकता अधिक वाढली होती.

कथेची सुरुवात आणि पहिला भाग
भारतावर होणारे दहशतवादी हल्ले मुळासकट थांबवण्यासाठी, गुप्तचर संस्था आयबी (IB) चे प्रमुख अजय सान्याल यांनी एक मोठी योजना आखली आहे. या योजनेलाच ‘धुरंधर’ असे नाव देण्यात आले आहे. पाकिस्तानच्या भूमीत घुसून त्यांच्या भारतविरोधी कारवायांचे मोठे नेटवर्क उद्ध्वस्त करणे, हे या मोहिमेचे मुख्य लक्ष्य आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे सर्वात मोठे हत्यार म्हणजे हमज़ा अली मजारी, ज्याची भूमिका रणवीर सिंह साकारत आहे.
चित्रपटाच्या सुरुवातीला, मुख्य नायक हमजा (रणवीर सिंह) पाकिस्तानच्या एका अत्यंत धोकादायक भागात, ज्याला ल्यारी टाऊन असे संबोधले जाते, तिथे प्रवेश करतो. तेथे त्याची ओळख रहमान डकैत (अक्षय खन्ना) या शक्तिशाली गुंडांच्या टोळीशी होते आणि हमजा त्यांच्या समूहात आपले स्थान पक्के करतो. या कथानकात मेजर इकबाल (अर्जुन रामपाल) आणि एसपी चौधरी असलम (संजय दत्त) यांसारख्या इतर महत्त्वाच्या आणि मोठ्या व्यक्तिरेखांचाही सहभाग चित्रपटाला आणखी दमदार बनवतो.
रणवीरचा अभिनय मोजका आणि दमदार आहे. त्याच्या शांत दृश्यांमध्येही कमालीचा ‘वाह’ क्षण अनुभवायला मिळतो. अक्षय, अर्जुन, संजय आणि माधवन या सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकेत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ल्यारी हे गुंडगिरी, अंधार आणि धोका यांनी भरलेले ठिकाण आहे. कराचीतील टोळ्यांमधील युद्ध, पाकिस्तानचे राजकारण, नकली भारतीय नोटांचा व्यापार आणि मुंबई हल्ल्याच्या कटाचा आधार या सगळ्याचा पहिल्या भागात समावेश आहे. हा पहिला भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.
दुसरा भाग
चित्रपटाचा पहिला भागात हमजाला (रणवीर सिंह) एक अतिशय संयमित आणि माहिती संकलित करणारा गुप्तहेर म्हणून सादर करण्यात आले आहे, पण दुसऱ्या भागात तो ॲक्शन मोडमध्ये येतो. कथेतील एका महत्त्वाच्या क्षणी, हमजा एका तरुणाला शस्त्र देताना दाखवण्यात आला आहे, जो तरुण पुढे अजमल कसाब म्हणून ओळखला जातो. हमजाला 26/11 च्या घटनेनंतर मोठे पाऊल उचलण्याची गरज वाटते.
त्यानुसार, त्याचा मुख्य लक्ष्य रहमान डकैत हा असतो. रहमानला संपवल्यास, पाकिस्तानमधील गुंड टोळ्यांमधील शक्तीचा समतोल बिघडून जाईल. याचा फायदा हमजाला भारतविरोधी कटांवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवता येईल असे त्याला वाटते. या दुसऱ्या भागात रणवीर सिंह अनेक थरारक ॲक्शन सीन्स करतांना दिसून आला आहे, ज्यांचे चित्रण अत्यंत प्रभावीपणे झाले आहे. चित्रपटाचा शेवट झाल्यावर लगेच उठू नका, कारण क्लायमॅक्सच्या शेवटी हमजाचे खरे नाव उघड होते. हे मिशन हमजाच्या दीर्घ लढाईतील केवळ एक टप्पा आहे, कारण अजून मेजर इकबाल आणि संपूर्ण कटाचा सूत्रधार असलेला ‘मोठ्या मास्टरमाइंड’ बद्दलची कथा अजून समोर येणे बाकी आहे.





