Mumbai: गेल्या काही दिवसांपूर्वीच हिंदी चित्रपट सृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital)) दाखल केले होते. आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 31 ऑक्टोबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून मिळाली आहे. त्यांना वयाशी संबंधित आरोग्य समस्या होत असल्याची माहिती समोर येत आहे.
काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. अभिनेते धर्मेंद्र यांच्या चाहता वर्ग खुप मोठा आहे. ते लवकराच लवकर बरे व्हावे अशी इच्छा चाहत्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर योग्य ते उपचार केले जात आहे.






