मुंबई: अंबरनाथ शहरात मध्यरात्री एक अत्यंत खळबळजनक घटना घडल्याने एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबरनाथ येथील भेंडीभाडा परिसरात प्रभाग क्रमांक 4 क मधील भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाला हल्लेखोरांनी (Devendra Fadnavis) लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास आलेल्या अज्ञात व्यक्तींनी या कार्यालयाच्या दिशेने 4 गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर ते तिथून पळून गेले.

या गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अंबरनाथ पश्चिम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच डीसीपी, एसीपी आणि जॉईंट सीपी यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून सुदैवाने कोणतीही कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, भाजपच्या उमेदवारासाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अंबरनाथमध्ये जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या आधी गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाली आहे. दरम्यान, भाजपचे उमेदवार पवन वाळेकर कि मुख्यमंत्री फडणवीस दोघांपैकी हल्लेखोरांच्या निशाण्यावर नेमकं कोण होतं हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून, पोलीस त्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी शहरात नाकाबंदी सुरू केली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.







