Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News: दौंड ते मोहोळ असा 150 किलोमीटरचा थरारक पाठलाग करून रेल्वेतील प्रवाशाला लुटणाऱ्या गुन्हेगारास अटक; 10 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास लोहमार्ग पोलिसांना यश

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 17 December 2025, 18:51
Daund News: Criminal arrested for robbing railway passenger after 150 km thrilling chase from Daund to Mohol; Railway police succeed in seizing valuables worth Rs 10 lakh

दौंड : बैंगलोर ते मुंबई यादरम्यान उद्यान (Daund News) एक्सप्रेस ने प्रवास करत असताना एक दाम्पत्य झोपेत असल्याचा फायदा घेऊन एका (Pune News) चोरट्याने त्यांच्याजवळील (Pune Crime) सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार दौंड (जि. पुणे) रेल्वे स्थानकावर मंगळवारी (ता.16) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. दौंड लोहमार्ग पोलिसांनी या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची चक्रे फिरवली. आणि दौंड ते मोहोळ असा 150 किलोमीटरचा थरारक पाठलाग करून गुन्हेगाराला अटक केली आहे.

 

चन्नाविर बस्वराज रामशेट्टी (वय 27, रा. कुभार गल्ली लक्ष्मी जवळ आळंद सुर ता उमरगाव जि कलबुर्गी राज्य कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन आयफोन, दोन सोन्याचे लेडीज ब्रेसलेट तसेच रोख 33 हजार रुपये असा दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविक ललीतकुमार जैन हे स्वतःचे लग्न असल्यामुळे कुटूंबासह बैंगलोर येथे गेले होते. लग्न झाल्यानंतर ते त्यांच्या बायकोच्या घरीच थांबले. तर त्यांच्या कुटूंबातील सदस्य व इतर नातेवाईक मुंबईला परत गेले होते. फिर्यादी भाविक, त्यांची पत्नी दिव्या व तीची मैत्रीन करिष्मा असे तिघेजण मुंबईला बैंगलोर मुंबई उ‌द्यान एक्सप्रेसने परतीचा प्रवास करत होते.

उ‌द्यान एक्सप्रेस मंगळवारी (ता.16) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावर आली. सोलापूर रेल्वे स्थानक गाडीने सुटल्यानंतर ते सर्वजण झोपी गेले. फिर्यादी भाविक जैन यांना साधारण पणे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जाग आली. तेंव्हा त्यांनी त्यांच्या बर्थ नंबर 36 वर ठेवलेली पांढ-या रंगाची सॅकबेंग पाहिली असता ती दिसून आली नाही. त्यांनी शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही.

याप्रकरणी भाविक जैन यांनी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी एक पथक तयार केले होते. पथकाने त्तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती घेतली असता, आरोपी पुणे सोलापूर महामार्गावरून चालला असल्याचे समजले.

पोलिसांच्या पथकाने दौंड ते कुरकुंभ व पुढे पुणे सोलापुर महामार्गावरून मळद, चिंचोली, भिगवन, लोणी, इंदापुर, टेभुर्णी, वेनगाव मोहोळ असा 150 किलोमिटरचा प्रवास करून आरोपीला मंचर-अक्कलकोट एस टी (नंबर एम एच 14 एम एच 7040) बसमध्ये मोठ्या शिताफीने पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात दोन आयफोन, डाव्या खिशात दोन सोन्याचे लेडीज ब्रेसलेट तसेच पॅन्ट च्या मागील खिशा मध्ये रोख 33 हजार रुपये आढळून आले. आरोपी चन्नाविर बस्वराज रामशेटटी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधिक्षक रोहीदास पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी मनोजकुमार यादव, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कोंगे, पोलीस अंमलदार आकाश चव्हाण, सजित जगताप, संदीप उसरे, व चालक संदीप काकडे यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Rajgad : विहीरमध्ये पालखी सोहळ्यात मधमाश्यांचा हल्ला; 65 जखमी, ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू

Thursday, 2 April 2026, 16:47

वारकऱ्यांनो लक्ष द्या! यंदा आषाढी वारी 1 महिना उशिरा; अधिक मासाचा पालखी सोहळ्यावर मोठा परिणाम

Thursday, 2 April 2026, 16:40

भोंदू खरातच्या दहशतीमुळे संपवलं आयुष्य; शिर्डीच्या विकास दिवटेसोबत काय घडलं? वाचा

Thursday, 2 April 2026, 16:21

लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार; राज्यात विवाह फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघड

Thursday, 2 April 2026, 16:12
Midnight terror in Fursungit! 4 drunk people running around, sharp weapons in their hands, shouting and terror in the area

फुरसुंगीत मध्यरात्री थरार! दारूच्या नशेत तर्राट 4 जण, हातात तीक्ष्ण हत्यारं, आरडाओरड अन् परिसरात दहशत

Thursday, 2 April 2026, 16:02

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Next Post
Jejuri News: A case of bribe of Rs 2,000 has been registered against a police constable and a private individual from Jejuri police station.

Jejuri News: जेजुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह खाजगी इसमावर 2 हजार रुपयांच्या लाचेचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.