Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: तहसीलदारालाच मंडल अधिकाऱ्याने घातला ‘गंडा! तक्रार मागे घेण्यासाठी मागितली चक्क 15 लाखांची खंडणी

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 19:58
Crime News: Mandal officer calls Tehsildar a 'gangster'! Demands Rs 15 lakh ransom to withdraw complaint

धाराशिव: तुळजापूर महसूल (Crime News) विभागात खळबळ उडवणारा एक (Dharashiv News) धक्कादायक प्रकार समोर आला असून, तहसीलदारालाच त्यांच्या अधीन असलेल्या मंडल अधिकाऱ्यांनी खंडणीची मागणी केल्याचे उघड झाले आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांना ब्लॅकमेल करून तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल 15 लाख रुपये मागितल्याप्रकरणी मंडल अधिकारी दिनेश बहिरमल आणि वकील बालाजी बोडके यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Breaking News)

 

क्रेडिट कार्डवर 4 लाखांची थकबाकी

तहसीलदार अरविंद शंकरराव बोळंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला. बोळंगे तुळजापूर येथे कार्यरत असून त्यांच्या अंतर्गत आरळी बु. येथील मंडळ अधिकारी म्हणून दिनेश बहिरमल प्रतिनियुक्तीवर काम करत होते. बहिरमल यांनी एसबीआयचे क्रेडिट कार्ड घेतले होते, ज्याची सुमारे 4 लाखांची थकबाकी होती. बँकेच्या वसुली कॉल्सपासून वाचण्यासाठी त्यांनी ‘कार्यालय प्रमुख’ म्हणून बोळंगे यांचा मोबाईल नंबर बँकेला दिला. (Marathi News)

शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार

विधानसभा निवडणुकीचे काम सुरू असताना बोळंगे यांना बँकेकडून वारंवार फोन येऊ लागले. त्यामुळे त्यांनी बहिरमल यांना जाब विचारला, मात्र उलट बहिरमल यांनी आनंदनगर (धाराशिव) पोलिस ठाण्यात बोळंगे यांनी शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार दाखल केली, ज्यावर गुन्हाही नोंदवण्यात आला.

तक्रार मागे घेण्यासाठीबी पैशांची मागणी

यानंतर ही तक्रार मागे घेण्यासाठी बहिरमल आणि त्यांचे वकील बालाजी बोडके यांनी बोळंगे यांच्याकडे पैशांची मागणी सुरू केली. सुरुवातीला 15 लाखांची मागणी करण्यात आली, नंतर ती कमी करून 10 लाख रुपये आणि माफीनामा अशी अट ठेवली. अखेरीस “माफीनामा नको, पण 2 लाख रुपये द्या” अशी मागणी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे करण्यात आली.

हेही वाचा: पुणेकरांसाठी ‘गुडन्यूज’! लोहगाव विमानतळबद्दल मोठा निर्णय; पुण्याच्या विकासाला ग्रीन सिग्नल…

6 डिसेंबर रोजी बहिरमल आणि बोडके हे बोळंगे यांच्या तुळजापूर येथील घरी गेले. तिथे त्यांनी पैसे जमा करण्यासाठी शहाजी अभिमान कांबळे यांच्या बँक खात्याचा तपशील व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि “पैसे दिल्यास पुढे काही त्रास होणार नाही” असे सांगितले.

या सततच्या धमक्या, मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून मंडल अधिकारी दिनेश बहिरमल आणि ॲड. बालाजी बोडके यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 308(3) (खंडणी) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत कांबळे करत आहेत. एका मंडल अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठ तहसीलदारालाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
Next Post
Crime News: Shocking! Mother's love for the same man who raped her unborn child; She supported him and continued to have sex...

Crime News: धक्कादायक! ज्याने पोटच्या पोरीवर बलात्कार केला त्याच नराधमावर जडलं आईचं प्रेम; त्यालाच पाठिंबा देत ठेवले शरीरसंबंध...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.