सध्या सोशल मीडियावर 19 मिनिटं 34 सेकंदाचा एक (Couple Viral Video) व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर (19 Min Viral Video) व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये (Couple Viral MMS) एक तरुण आणि एक तरुणी आक्षेपार्ह स्थितीत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ खरा आहे की बनावट, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरीही सोशल मीडियावर या व्हिडिओला जोडून अनेक दावे केले जात आहेत आणि विविध चर्चा सुरु आहेत.

या व्हिडिओमधील मुलीने आत्महत्या केल्याचा दावा काही नेटकऱ्यांकडून केला जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलीने आयुष्य संपवल्याची माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र हा दावा कितपत खरा आहे, याबाबत पोलीस किंवा अधिकृत यंत्रणांकडून कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे हे सर्व दावे केवळ सोशल मीडिया चर्चांपुरते मर्यादित असल्याचे दिसत आहे.
नेमका हा व्हिडिओ इंटरनेटवर कसा पोहोचला, तो कोणत्या ठिकाणी शूट केला गेला, यात दिसणारे दोघेजण कोण आहेत, तसेच व्हिडिओ पसरवण्यामागे कोणते कारण आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. काही जणांचा अंदाज आहे की प्रसिद्धी मिळवण्यासाठीच दोघांनी हा व्हिडिओ मुद्दाम अपलोड केला असावा, तर काहींचा दावा आहे की हा व्हिडिओ कोणीतरी चोरीने लीक केला आहे. मात्र या सर्वावर अजूनही स्पष्टता नाही.
तज्ज्ञांच्या मतानुसार, अशा प्रकारचे व्हिडिओ खरे असोत वा बनावट, त्यांचा सामाजिक आणि मानसिक परिणाम गंभीर असतो. त्यामुळे कोणताही अप्रमाणित व्हिडिओ फॉरवर्ड करणे किंवा त्यावर आधारित निष्कर्ष काढणे टाळावे.
या प्रकरणाबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत कारवाई किंवा निवेदन अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे व्हिडिओबाबत सोशल मीडियावर पसरवले जात असलेले दावे पडताळून पाहण्याचे आणि अफवांना बळी न पडण्याचे आवाहन नागरिकांकडून केले जात आहे.






