Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवघ्या १०० रुपयांसाठी कापला महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा हात ; पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 1 January 2023, 17:20

पुणे : शंभर रुपयांसाठी चौघांनी एका विद्यार्थ्याचा डावा हात मनगटापासून कापून टाकल्याची धक्कादायक घटना चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून या प्रकरणी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

आशुतोष अर्जुन माने (वय -२४ सध्या रा. दुर्वांकुर ३ पंचवटी, पाषाण, मुळ रा. रेटरे हर्नाक्ष, ता. वाळवा, जि. सांगली) असे हात कापलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याप्रकरणी माने यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चतुःश्रृंगी पोलिसांनी प्रणव काशिनाथ वाघमारे (वय-१८, रा. शिक्षक कॉलनी, सुस रोड, पाषाण) व गौरव गौतम मानवतकर (वय-२०, रा. शिवनगर बस स्टॉप जवळ, तोंडेचाळ, सुतारवाडी, पाषाण) तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदार असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशुतोष माने हे मागील २ महिन्यापासून पाषाण परिसरात राहत असून ते सर्वजण सीडॅक एसीटीएस या इन्स्टीटयुटमध्ये सी-डॅक कोर्स करत आहेत. ३१ डिसेंबर रोजी मेस बंद असल्याने आशुतोष माने, साजीद शेख, पंकज तांबोळी हे तिघेजण रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास साई चौकात आले. तेथे पंकजचा मित्र मयुर फुंदे हा देखील जेवण करण्यासाठी आला होता. सर्वांनी हर्षद हॉटेलमध्ये जेवण केले आणि ते रोडवर बाहेर थांबले.

 

सव्वा एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण आले व त्यांनी मयुर व पंकज यांच्याकडे १०० रूपयांची मागणी केली. यावेळी पंकजने त्यांना पैसे नसल्याचे सांगितले. मोटारसायकल स्वारांनी त्यांच्याकडे पैशासाठी जबरदस्ती केली. त्यास पंकजने तीव्र विरोध केला. मुलांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

मोटारसायकल स्वारांनी त्यांच्या मित्रांना फोन लावला आणि थोडयाच वेळात तिथे आणखी दोघेजण आले. चौघांनी एकाने पंकजने पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या डाव्या हातावर धारदार हत्याराने वार करण्यास सुरूवात केली. काही क्षणातच पंकजचा डावा हात मनगटापासून खाली पडला.

दरम्यान, रक्तस्त्राव वेगाने होत असल्याने परिसरातील नागरिक व मित्र घाबरून गेले. काही क्षणातच घटनास्थळी चतुःश्रुंगी पोलिस दाखल झाले आणि त्यांनी तात्काळ पंकजला उपचारासाठी ज्युपीटर हॉस्पीटलमध्ये रवाना केले.

याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी रविवारी दुपारपर्यंत परिसरातून प्रणव वाघमारे आणि गौरव मानवतकर यांना अटक केली होती तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले होते. चतुःश्रृंगी पोलिस गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

बार्शी तालुक्यात शोभेच्या दारू कारखान्याला भीषण आग ; आगीत होरपळून ५ जणांचा जागेवरच मृत्यू, २५ पेक्षा अधिक जखमी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.