पुणे : राज्यात मागील (Breaking News) काही दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन (Pune News) करणाऱ्या माफियांनी उच्छाद मांडला होता. अखेर महसूल (Maval News) विभागाने कडक कारवाई (Pune Crime) करत पुणे जिल्ह्यातील 3 तहसीलदार, 4 मंडल अधिकारी आणि 2 तलाठ्यांना थेट निलंबित केले आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही कारवाई केली असून त्यामुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. (Chandrashekhar Bawankule)

मावळ तालुक्यात वाळू उपसा
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील मंगरूळ परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू आणि गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे उघडकीस आले होते. महसूल विभागाचे नियम आणि वन कायद्याचे उल्लंघन करून हे उत्खनन करण्यात येत होते. डिसेंबर 2024 मध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर याबाबत गंभीर दखल घेण्यात आली. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रकरणी थेट कारवाईचे आदेश दिले होते.
तपासात धक्कादायक माहिती समोर
तपासात गट क्रमांक 36, 37, 41 आणि 42 मधील वनक्षेत्रात रॉयल्टी न भरता माती, मुरूम आणि डबर यांचे अनधिकृत उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले. अंदाजे 40 हजार ते 90 हजार ब्रास इतक्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन झाल्याचे आढळून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या अवैध उत्खननामागे संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि जबाबदारी टाळल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांचं तात्काळ निलंबन
या प्रकरणी जबाबदार धरत तीन तहसीलदार, चार मंडल अधिकारी आणि दोन तलाठी यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. स्थानिक आमदारांनी विधानसभेत या विषयावर लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर महसूल विभागाने ही कठोर कारवाई केली. अवैध वाळू उत्खननाला आळा घालण्यासाठी पुढील काळात आणखी कडक पावले उचलली जातील, असे संकेत महसूल विभागाकडून देण्यात आले आहेत.







