Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Alibaug Accident: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! घरी जुळी मुलं आल्याचा आनंद नियतीला पाहवला नाही; काही तासांतच वनरक्षक पित्याचा अपघाती मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 7 March 2026, 22:33

Alibaug Accident: रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये (Alibag) एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून एका कुटुंबाचा आनंद काही तासांतच दुखात बदलला आहे. अलिबाग वनविभागात वनरक्षक म्हणून कार्यरत असलेले सुरज सारंगे यांचा रस्ता अपघातात (Accident) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. शुक्रवारी 6 मार्च रोजी रात्री उशिरा ही घटना रेवस ते रेड्डी मार्गावर घडली. रस्त्यावर खोदलेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांची दुचाकी कोसळल्याने हा अपघात झाला.

 

सुरज सारंगे हे मुरुड तालुक्यातील सर्वे गावचे रहिवासी होते. ते तिनविरा भागात आपली सेवा बजावत होते. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री काम संपवून ते दुचाकीवरून घराकडे निघाले होते. या मार्गावर सध्या रस्त्याचे काम सुरू असून तिथे एक खोल खड्डा खोदलेला होता. रात्रीच्या वेळी अंधार असल्याने त्यांना हा खड्डा दिसला नाही आणि त्यांची दुचाकी थेट खड्ड्यात कोसळली. या भीषण अपघातात गंभीर इजा झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेतील सर्वात ह्रदयद्रावक बाब म्हणजे सुरज यांना काही दिवसांपूर्वीच जुळी मुले झाली होती. शुक्रवारी दुपारीच त्यांची दोन्ही बाळे आणि पत्नी रुग्णालयातून घरी आली होती. पूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते आणि सर्वजण या नव्या पाहुण्यांच्या स्वागतात गुंतले होते. मात्र, त्या रात्री काळाने घाला घातल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे.

या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला आहे. रस्ता खोदलेल्या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, तिथे बॅरिकेट्स किंवा सूचना फलक लावले नव्हते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळेच एका तरुण वनरक्षकाचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. वनपाल संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post

Daily Horoscope: रंगपंचमीच्या दिवशी 'या' राशींवर होणार ग्रहांची विशेष कृपा! तुमची रास यात आहे का? वाचा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.