अहिल्यानगर: राज्यात अग्रगण्य म्हणून (Ahilyanagar News) ओळखल्या जाणाऱ्या (Samata Nagari Patsanstha) समता नागरी सहकारी पतसंस्थेवर (Nagar News) भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप (Kopargaon News) झाल्याने मोठी खळबळ (Pune News) उडाली आहे. या (Pune Crime) प्रकरणी सहकार आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिल्यामुळे पतसंस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, समता पतसंस्थेवर करण्यात येणारे आरोप हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा संचालक संदीप कोयटे यांनी केला आहे. पतसंस्थेचे संस्थापक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्यामुळे या प्रकरणाला निवडणुकीची किनार असल्याची चर्चा कोपरगाव आणि परिसरात सुरू आहे.

पतसंस्थेवर आरोप
नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथील कर्जदार वसंत घोडके यांनी समता पतसंस्थेवर 40 कोटी रुपयांची जमीन केवळ 5 कोटी रुपयांना परस्पर विकल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीच्या आधारे पतसंस्थेच्या संचालकांसह सात जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कर्जदार संजय मोरे, ओमप्रकाश खके आणि वसंत घोडके यांनी स्वतंत्रपणे केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सहकार आयुक्तांनी समता पतसंस्थेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गंभीरता आणखी वाढली आहे.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राज्यभरात 30 शाखा असून, संस्थेत 1100 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी आहेत. मात्र, या आरोपांमुळे ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठेवीदार संस्थेच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करत आहेत.
बदनामी करण्याचा प्रयत्न
दरम्यान, समता पतसंस्थेचे चेअरमन संदीप कोयटे यांनी सर्व आरोप ठामपणे फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, सभासदांचा आणि ठेवीदारांचा संस्थेवर पूर्ण विश्वास आहे. संस्थेचे संस्थापक काकासाहेब कोयटे हे कोपरगाव नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत असल्याने संस्थेवर आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कोणतीही चौकशी झाली तरी आम्ही पूर्ण सहकार्य करू, अशी भूमिका कोयटे यांनी मांडली आहे.
राजकीय खळबळ
समता पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणे आणि सहकार विभागाकडून चौकशी सुरू होणे यामुळे कोपरगावमधील राजकीय वातावरण तापले आहे. काकासाहेब कोयटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याने आगामी पालिका निवडणुकीत हा मुद्दा गाजणार, हे निश्चित मानले जात आहे. 20 तारखेला मतदान होणार असून राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







