जर तुम्ही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी पात्रता काय? आणि यासाठी अर्ज कसा करायचा जाणून घेऊया…

किती जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ही भरती जाहीर केली असून, प्रशिक्षणार्थी पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती नाशिक येथे होणार आहे. या भरती अंतर्गत एकूण ३६७ पदे भरली जाणार आहेत.

कोणत्या पदांसाठी भरती?
या भरती अंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, शिटमेटल वर्कर, वेल्डर, पेन्टर,डिझेल मॅकेनिर अशा विविध पदांसाठी भरती होणार आहे.
शैक्षणिक पात्रता?
एसटी महामंडळातील या नोकरीसाठी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेले उमेदवार अर्ज करु शकतात. आयटीआय पदवीधर उमेदवारदेखील विविध पदांसाठी अर्ज करु शकतात.
अर्ज कसा करावा?
यासाठी उमेदवारांना सर्वात आधी http://www.apprenticeshipindia.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करायचे आहे. यानंतर अर्ज भरुन एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, नाशिक येथे द्यायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख
या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने ११ ऑगस्टपूर्वी वर दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करायचा आहे. लक्षात घ्या उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.







