पुणे: प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात कशी होणार, आज कोणती शुभ-अशुभ घटना घडेल, याबद्दल उत्सुकता असते. ग्रहांची स्थिती आणि नक्षत्रांच्या बदलांनुसार प्रत्येक राशीसाठी दिवस काही ना काही संदेश घेऊन येतो. आज, 5 ऑगस्ट 2025, मंगळवारचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा असेल? नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक जीवनात कोणते बदल संभवतात, हे जाणून घेण्यासाठी वाचा आजचे सविस्तर राशीभविष्य….

मेष (Aries)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असला तरी दुपारनंतरच तुमची महत्त्वाची कामे मार्गी लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन करणे महत्त्वाचे आहे. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा.
वृषभ (Taurus)
आज तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. मन काहीसे नकारात्मक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध चांगले राहतील. व्यवसायात नवीन योजना आखल्यास फायदा होईल.
मिथुन (Gemini)
आज तुम्ही तुमच्या मतांवर ठाम राहाल आणि त्यात तुम्हाला यशही मिळेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. आजचा दिवस मनोरंजनात आणि आनंदात घालवाल.
कर्क (Cancer)
कामाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. तुम्ही हाती घेतलेल्या कामात सुयश मिळेल. दुपारनंतर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळू शकेल.
सिंह (Leo)
आज तुम्हाला एक नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. यामुळे तुमच्यातील उत्साह आणि उमेद वाढेल. कुटुंबात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे.
कन्या (Virgo)
नोकरी आणि व्यवसायात तुमची स्थिती समाधानकारक राहील. वडीलधाऱ्यांकडून किंवा आध्यात्मिक गुरूकडून मार्गदर्शन मिळेल. महत्त्वाच्या कामांसाठी वेळ काढाल.
तुळ (Libra)
आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक असेल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील. दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कौटुंबिक वाद होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक (Scorpio)
आज तुम्हाला प्रियजनांचा सहवास लाभेल आणि अनेकांचे सहकार्यही मिळेल. दिवस मध्यम फलदायी असला तरी सकाळचा काळ आनंदात जाईल. दुपारनंतर अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius)
आज तुम्हाला कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता काम करावे लागेल. वस्तू गहाळ होणार नाही याची काळजी घ्या. आत्मविश्वासपूर्वक अडचणींचा सामना करा, यश मिळेल.
मकर (Capricorn)
आज महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. संततीकडून सुखद बातमी मिळेल. व्यवसायात लाभ होईल. दुपारनंतर मानसिक अस्वस्थता जाणवू शकते, बोलताना गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या.
कुंभ (Aquarius)
तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत वरिष्ठांची प्रशंसा होईल आणि पदोन्नतीची शक्यता आहे.
मीन (Pisces)
तुमची रखडलेली कामे आज मार्गी लावू शकाल. एखादी महत्त्वाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित प्रवासामुळे थोडी धावपळ होऊ शकते, मात्र यश नक्की मिळेल.






