पुणे: 2026 सालामध्ये सूर्यदेवाची (Surya Dev Puja) उपासना करणे आणि त्यांच्याशी संबंधित वस्तू घरात ठेवणे अत्यंत शुभ मानले जात आहे. नवीन वर्षात सुख आणि समृद्धी मिळवण्यासाठी घराच्या पूर्व दिशेला सूर्यदेवाची मूर्ती किंवा फोटो लावणे फायदेशीर ठरेल. यामुळे कुटुंबातील सदस्यांचा समाजात मान वाढतो आणि प्रगतीचे नवनवीन मार्ग खुले होतात. करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हा एक सोपा उपाय मानला जातो. याचसोबत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवर तांब्याचे सूर्यचिन्ह लावणे देखील लाभदायक ठरते. या चिन्हाची रोज पूजा करून त्याला कुंकवाचा टिळा लावल्यास कामात येणारे अडथळे दूर होतात आणि घरात सकारात्मक वातावरण टिकून राहते.

सूर्याची कृपा मिळवण्यासाठी दर रविवारी दानधर्म करणे उत्तम मानले जाते. या दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तीला गूळ, गहू किंवा काही पैसे दान केल्याने सूर्यदेव प्रसन्न होतात. पाणी अर्पण करताना ॐ सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्याने मनाला शांती मिळते आणि सकारात्मक विचारांची वाढ होते. कोणतीही पूजा किंवा सूर्याला पाणी देताना आपले तोंड नेहमी पूर्व दिशेला असावे, कारण ही दिशा सूर्याची शक्ती आकर्षित करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते.
धनसंपत्तीमध्ये वाढ करण्यासाठी तांब्याच्या वस्तूंचा वापर वाढवणे चांगले मानले जाते. तांब्याचा ग्लास किंवा इतर शोभेच्या वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि घरात समाधान राहते. याशिवाय सात घोड्यांच्या रथावर स्वार असलेल्या सूर्यदेवाची फोटो पूर्व दिशेला लावणे विशेष फलदायी ठरेल. ही फोटो ऊर्जा आणि ज्ञानाचे प्रतीक मानली जाते, ज्यामुळे घरातील आनंदी वातावरण कायम राहते. केवळ वस्तू आणून न थांबता रोज सकाळी सूर्याला जल अर्पण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तांब्याच्या कलशमध्ये थोडे लाल फूल, अक्षता आणि कुंकू टाकून उगवत्या सूर्याला पाणी दिल्यास जीवनात शांती मिळते.
२०२६ हे वर्ष सूर्याचे वर्ष असल्याचे म्हटले जात असल्याने या लहान बदलांमुळे घरात आनंद आणि यश येईल अशी श्रद्धा आहे. ही माहिती प्रचलित ज्योतिषीय समजुतींवर आधारित असून वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे.







