Horoscope 2026: 2025 वर्ष संपत आले असून आता (Rashibhavishya 2026) काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 2026 येण्याआधी हे वर्ष कसे जाणार, याबद्दल (Rahichakra 2026) अनेकांना उत्सुकता आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस, म्हणजेच 1 जानेवारी 2026 कसा जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरही याबाबत विविध ज्योतिषी भाकिते मांडत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाहिले असता 2026 चा पहिला दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

ज्योतिषशास्त्रानुसार 1 जानेवारी 2026 रोजी चंद्र वृषभ राशीत असेल, तर सूर्य धनु राशीत राहील. त्या दिवशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी, शुभ योग आणि रोहिणी नक्षत्र असणार आहे. तसेच सूर्य आणि बुध एकाच राशीत असल्याने बुधादित्य योग तयार होईल. यासोबतच चतुर्ग्रही योगही निर्माण होणार आहे. या ग्रहस्थितीमुळे नवीन वर्षाचा पहिला दिवस एकूणच शुभ मानला जात आहे. मात्र 12 राशींमधील तीन राशींना या दिवशी विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मेष (Aries Horosope 2026)
मेष राशीच्या लोकांसाठी 2026 चा पहिला दिवस अत्यंत भाग्यवान ठरू शकतो. या दिवशी संपत्ती आणि मालमत्तेत वाढ होण्याचे योग आहेत. नवीन घर, फ्लॅट, जमीन, दुकान किंवा वाहन खरेदीची संधी मिळू शकते. उत्पन्नात वाढ होईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. पद, प्रतिष्ठा आणि सामाजिक ओळख वाढेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील आणि काही लोक कर्जमुक्त होण्याचा निर्णय घेऊ शकतात.
कन्या (Virgo Horosope 2026)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस खूपच सकारात्मक राहील. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे, तर लग्नासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले स्थळ मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळतील. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. व्यवसायात नफा वाढेल. न्यायालयीन प्रकरणांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल आणि आर्थिक लाभामुळे मनःशांती मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस अनुकूल ठरू शकतो.
मकर (Capricorn Horosope 2026)
मकर राशीच्या लोकांसाठीही 2026 ची सुरुवात शुभ संकेत घेऊन येईल. परदेश प्रवास, परदेशातील शिक्षण किंवा नोकरीसाठी संधी मिळू शकते. सन्मान किंवा यश प्राप्त होण्याची शक्यता आहे. लग्न ठरण्याचे योग आहेत. वाहन किंवा घर खरेदीचा आनंद मिळू शकतो. बँक बॅलन्स वाढेल आणि खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. नवीन वर्षाची सुरुवात धार्मिक किंवा आध्यात्मिक उपक्रमांनी केल्यास अधिक सकारात्मक परिणाम मिळतील.
एकूणच, 1 जानेवारी 2026 हा दिवस अनेकांसाठी आशादायक असला तरी मेष, कन्या आणि मकर या तीन राशींसाठी तो विशेष फलदायी ठरण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रातून व्यक्त केली जात आहे.







