तामिळनाडू: साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने गुपचूप दुसरे लग्न उरकले असल्याची बातमी समोर (Raj Nidimoru) आली आहे. समंथानं ‘द फॅमिली मॅन’चे निर्माते राज निदिमोरू (Samantha Marriage) यांच्याशी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रात लग्न केले आहे. 1 डिसेंबर 2025 रोजी हा लग्नसोहळा पार पडला. या लग्नासाठी दोघांचेही जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

समंथानं राज निदिमोरूशी लग्न केल्यानंतर सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत राज समंथाच्या हातात अंगठी घालताना दिसतो आहे. या फोटोला समंथानं “1-12-2025” असे कॅप्शन दिले आहे. लग्नाच्या फोटोंमध्ये समंथानं लाल रंगाची साडी नेसलेली आहे, तर राजनं पांढरा कुर्ता-पायजमा आणि बेज कलरचं जॅकेट परिधान केले आहे. एका फोटोत दोघे लग्नाचे विधी करताना दिसत आहेत.
राज निदिमोरू हे ‘द फॅमिली मॅन’ या लोकप्रिय वेब सीरिजमुळे प्रसिद्ध झाले. त्यांनी कृष्णा दसरकोथापल्ली यांच्यासोबत ही सीरिज तयार केली. हे दोघे ‘राज अँड डीके’ या नावाने ओळखले जातात. त्यांनी ‘फर्गी’, ‘सिटाडेल: हनी बनी’ आणि ‘गन्स एन रोझेस’ सारख्या प्रोजेक्ट्सवर काम केले आहे. याशिवाय ’99’, ‘शोर इन द सिटी’, ‘गो गोवा गॉन’, ‘हॅपी एंडिंग’ आणि ‘अ जेंटलमन’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे. त्यांनी 2018 मध्ये आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाची कथाही लिहिली होती.
समंथा आणि राज या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. राज निदिमोरू यांच्या एक्स-वाईफ श्यामली डे यांनी रविवारी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती, ज्यात त्यांनी “desperate people do desperate things…” असे लिहिले होते. या पोस्टनंतरच समंथा आणि राज यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. राज आणि श्यामली यांनी 2022 मध्ये घटस्फोट घेतला होता.







