मुंबई: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाची (Dharmendra Death Rumour) बातमी देशभरात वाऱ्यासारखी पसरली, ज्यामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. गेले काही दिवस प्रकृती ठिक नसल्यामुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ते व्हेंटिलेटरवर असल्याचीही बातमी समोर आली होती.

माध्यमांवर हेमा मालिनी संतापल्या
धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. दरम्यान, निधनाच्या अफवा पसरवणाऱ्या माध्यमांवर हेमा मालिनी यांनी ट्विट करत तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “जबाबदार माध्यमे निधनाचे वृत्त कसे काय देऊ शकतात?” यासोबतच, त्यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल सकारात्मक माहिती दिली असून, ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे सांगितले आहे.
पाहा पोस्ट:
#EshaDeol clarifies that her father, #Dharmendra is stable and recovering and denies the false news on social media.#News #Trending pic.twitter.com/G3eR1AGUCs
— Filmfare (@filmfare) November 11, 2025
ईशा देओलकडून चाहत्यांना आवाहन
मुलगी ईशा देओल हिनंही इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पुढे ईशाने लिहिले, “तुम्ही माझ्या वडिलांसाठी ज्या प्रार्थना केल्या, त्याबद्दल धन्यवाद!” अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.







