मुंबई: ‘बिग बॉस 19’ हा छोट्या टेलिव्हिजन वरचा एक (Big Boss 19) प्रसिद्ध आणि वादग्रस्त (Kinickaa Sadanand) रिऐलिटी शो आहे, या शोचे (Tanya Mittal) आता काहीच भाग राहिले असून लवकरच विजेता घोषित केला जाईल. देशभरातून लोकं या शो बघत असतात आणि या शोचा चाहता वर्ग फार मोठा आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये कुनिका सदानंदने मालती चहरबद्दल एक धक्कादायक विधान केले, ज्यामुळेतिला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रॉल केलं. कुनिकाने तान्या मित्तलसोबत बोलताना म्हटले की, मालती लेस्बियन असण्याची शक्यता आहे. तान्याने या विधानावर काहीही प्रतिसाद दिला नाही, तरी कुनिका सातत्याने या मुद्द्यावर बोलत राहिली.

कुनिकाच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मालतीचे चाहते संतापले असून त्यांनी सोशल मीडियावर तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले की, “नॅशनल टीव्हीवर कोणाच्या सेक्सुअॅलिटीबद्दल प्रश्न विचारणं हे चुकीचे आहे. कुनिकाला लाज वाटायला हवी.” दुसऱ्या कमेंटमध्ये म्हटले आहे, “आता वीकेंडला तिला कळेल की ती काय बोलून गेली.” तर दुसरीकडे तान्याचे चाहते या सगळ्या वादापासून दूर राहत तिचं कौतुक करताना दिसत आहेत.
या आठवड्यातल्या ‘बिग बॉस 19’च्या वीकेंडचा वारमध्ये सलमान नाही तर रोहित शेट्टी एपिसोड होस्ट करताना दिसणार आहेत. प्रोमोमध्ये रोहित शेट्टी स्पर्धकांना शिस्त लावताना दिसत आहे. विशेषतः अमाल मलिक आणि शहबाज बदेशाला ‘बायस्ट’ म्हणून त्यांच्यावर निशाणा साधताना रोहित शेट्टी दिसतोय. शेवटी, या आठवड्याच्या एपिसोडमध्ये कुणीही वादग्रस्त विधान केलं किंवा चुकीच्या पद्धतीने वागलं तरी रोहित शेट्टीची शाळा त्यांना योग्य तो धडा देईल.







