नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकांनी Starlink हे नाव ऐकले असेल. या Starlink च्या माध्यमातून सॅटेलाइट इंटरनेट कनेक्टिव्हिटी दिली जाते. या कंपनीकडून भारतात येण्याची तयारी सुरु केली जात आहे. असे असताना आता आणखी एक अमेरिकन कंपनी भारतात आपला विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले आहे.

आता स्टारलिंक व्यतिरिक्त, Amazon च्या Quiper ला लवकरच भारतात नियामक मान्यता दिली जाऊ शकते, अशी माहिती आहे. Amazon चे Quiper देखील भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. त्याचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण भागात होईल, जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. Starlink ने Bharti Airtel आणि Jio Platforms Limited सोबत भागीदारी केल्यानंतर, दूरसंचार विभाग (DoT) आणि IN-SPACE कडून मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.

तसेच एका वेबसाईटनुसार, ॲमेझॉनच्या क्विपरला भारतात मान्यता मिळण्यास अडचण येऊ शकणार नाही. जर ही नवी सेवा भारतात आली तर देशात आणखी सुपरफास्ट इंटरनेट सेवा मिळू शकते. ज्याचा युजर्सला सर्वाधिक फायदा होऊ शकतो. स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यासाठी काही अटींचे पालन करण्यास मान्यता दिली आहे.








