मुंबई: देशांतर्गत सराफा बाजारात 13 जानेवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली आहे. आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 1,41,620 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याचा दर अंदाजे 1,29,818 प्रति 10 ग्रॅम आहे, तर पुण्यात 24 कॅरेटचा दर 1,35,773 प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेटचा दर 1,25,950 प्रति 10 ग्रॅम आहे. (Gold Rate Today)

कालच्या तुलनेत दरात वाढ
12 जानेवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम दर 1,28,740 रुपये, 24 कॅरेट 1,40,450 रुपये आणि 18 कॅरेट 1,05,330 रुपये होता. चांदीचा भाव तेव्हा प्रति किलोग्रॅम 2,59,900 रुपये नोंदवला गेला होता.
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळुरु, कोलकाता, केरळ, हैद्राबाद आणि नागपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,310 रुपये, 24 कॅरेट 1,42,160 रुपये आणि 18 कॅरेट 1,06,620 रुपये आहे.
दिल्ली, लखनौ, जयपूर आणि चंदीगड येथे 22 कॅरेट सोनं 1,30,460 रुपये, 24 कॅरेट 1,42,310 रुपये आणि 18 कॅरेट 1,06,770 रुपये दराने उपलब्ध आहे.

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,30,340 रुपये, 24 कॅरेट 1,42,190 रुपये आणि 18 कॅरेट 1,06,650 रुपये असून सुरतमध्ये अनुक्रमे 1,30,360 रुपये, 1,42,210 रुपये आणि 1,06,670 रुपये दर आहेत.
टीप: वरील दरांमध्ये जीएसटी, टीसीएस व इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी ग्राहकांनी स्थानिक सराफा व्यावसायिकांशी संपर्क साधावा.




