मुंबई : एका चिनी स्टार्टअपने DeepSeek नावाचे AI मॉडेल लाँच करून जगात खळबळ उडवून दिली. विशेषत: या एका ॲपमुळे अमेरिकन बाजारपेठेत मोठी घसरण झाल्याचे पाहिला मिळाले. अमेरिकन टेक कंपनी NVIDIA चे शेअर्स दोन दिवसांत 20 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, ज्यामुळे या कंपनीचे बाजार मूल्य 600 अब्ज डॉलरने घसरले आहे.

अमेरिकेशिवाय DeepSeek चा प्रभाव भारतीय शेअर बाजारावरही दिसून येत आहे. DeepSeek R1 मॉडेल बाजारात लाँच झाल्यापासून, भारतीय बाजारात सूचीबद्ध काही कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती गेल्या 2 ते 3 ट्रेडिंग सत्रांमध्ये 50 टक्क्यांनी घसरल्या आहेत. म्हणजेच या शेअर्सची किंमत निम्म्यावर आली आहे. ज्या देशांतर्गत शेअर्समध्ये घसरण झाली आहे त्यात अनंत राज, नेटवेब टेक्नॉलॉजीज इंडिया (नेटवेब शेअर) आणि झेन टेक्नॉलॉजीज (झेन टेक्नॉलॉजीज स्टॉक) यासह इतर टेक कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
चिनी AI स्टार्ट-अप DeepSeek च्या निर्मितीनंतर NVIDIA शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. NVIDIA च्या शेअर्सच्या घसरणीचा परिणाम काही भारतीय कंपन्यांवरही दिसून येत आहे. DeepSeek चा दावा आहे की, हा ChatGPT चा पर्याय आहे, कमी किमतीत आणि कमी चिप्स असलेले मॉडेलचा बेस्ट पर्याय उपलब्ध करून देतो. तसेच हे मॉडेल पूर्णपणे मोफत असे आहे.







