2026 Gold-Silver Rate: 2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात (Gold Rate In 2026) मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. वर्षाच्या सुरुवातीला सुरू झालेली तेजी वर्षअखेरीपर्यंत कायम (Gold Rate) राहिल्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला (Gold Rate Today) आहे. अहवालानुसार डिसेंबर 2024 मध्ये चांदीचा दर 85146 रुपये प्रति किलो होता. मात्र 2025 अखेरीस चांदीचा दर थेट सव्वा 2 लाख रुपयांवर पोहोचला आहे. (Latest Marathi News)

अवघ्या एका वर्षात चांदीच्या दरात सुमारे 144 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचबरोबर सोन्याच्या दरातही जवळपास 73 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या वाढीमुळे सोने आणि चांदीतील गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. आता 2026 मध्येही ही तेजी कायम राहणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
गुंतवणूक सल्लागारांच्या मते 2026 मध्येही सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे, मात्र वाढीचा वेग तुलनेने कमी असू शकतो. तज्ज्ञांच्या मते जागतिक आर्थिक परिस्थिती आणि कमी व्याजदर लक्षात घेता सोन्याचे दर स्थिर राहू शकतात. मात्र औद्योगिक वापर वाढल्याने चांदी सोन्याच्या तुलनेत अधिक परतावा देऊ शकते.
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार येत्या काळात सोन्याचे दर 1.50 लाख ते 1.65 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात. तर चांदीचे दर 2.30 लाख ते 2.50 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
सोने आणि चांदीच्या दरवाढीमागे काही महत्त्वाची कारणे आहेत. जगभरातील केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असल्याने मागणी वाढली आहे. दुसरीकडे उद्योगधंद्यांमध्ये चांदीचा वापर वाढल्याने चांदीचे दरही चढत आहेत.
गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की सोन्यात दीर्घकालीन एसआयपी करणे सुरक्षित पर्याय ठरू शकतो. सोनं स्थिरता देते, तर चांदीतील तेजीमुळे अधिक नफा मिळण्याची संधी आहे. तज्ज्ञ यांनीही चांदीत एसआयपी करण्याचा सल्ला दिला असून, दरातील चढ-उतारांपासून बचावासाठी ही पद्धत उपयुक्त ठरू शकते.







