Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : ‘झटपट पैसा’ कमावण्याच्या नादात… तरुणीला आला ‘ऑनलाइन टास्क’चा मेसेज.. आणि पुढे काय घडलं वाचा सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 November 2025, 14:24
pune crime

Photo- ppn

Pune Crime : पुणे शहरात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  सायबर गुन्हेगारांचाही (Cyber Criminals) मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट पहायला मिळतोय. जास्त परतावा मिळेल म्हणून गोड बोलून त्यांनी शहरातील लोकांची मोठ्या पैशांची फसवणूक केलीये. धक्कादायक बाब म्हणजे, केवळ एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सायबर चोरट्यांनी तब्बल ३९ लाख ५६ हजार रुपयांहून अधिक रकमेवर डल्ला मारला आहे. यामध्ये एका तरुणीला ‘ऑनलाइन टास्क’च्या नावाखाली १२ लाखांहून अधिक, तर एका व्यक्तीला ‘शेअर मार्केट’मध्ये गुंतवणुकीच्या नावाने २७ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घालण्यात आला आहे. Pune Crime

 

ऑनलाइन टास्कच्या जाळ्यात तरुणीची १२ लाखांची फसवणूक

पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणुकीची पहिली घटना उघडकीस आली. सायबर चोरट्यांनी एका तरुणीच्या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून तिला घरबसल्या ‘ऑनलाइन टास्क’ पूर्ण करून त्वरित पैसे कमवण्याची संधी देऊ केली. चोरट्यांनी सुरुवातीला काही किरकोळ रक्कम परत देऊन तरुणीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तिला मोठी रक्कम गुंतवल्यास ‘व्हीआयपी मेंबरशिप’ मिळेल आणि त्यातून अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. या भूलथापांना बळी पडून तरुणीने वेळोवेळी चोरट्यांच्या बँक खात्यात १२ लाख १५ हजार रुपयांची रक्कम जमा केली. मात्र, रक्कम जमा होताच चोरट्यांनी परतावा देणे बंद केले आणि संपर्क तोडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने तात्काळ विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शेअर मार्केटमध्ये उच्च परताव्याच्या नावाखाली २७ लाखांचा गंडा

फसवणुकीची दुसरी आणि मोठी घटना खडकी (रेंजहिल्स) परिसरात घडली. येथील एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी संपर्क साधून शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी त्यांना बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आणि नफ्याचे खोटे स्क्रीनशॉट्स दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. चांगल्या नफ्याच्या अपेक्षेने या व्यक्तीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम जमा केली. अशा प्रकारे फिर्यादीची २७ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम हडप करण्यात आली. गुंतवणूक करूनही अपेक्षित परतावा मिळत नाहीये, हे लक्षात येताच त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीची तक्रार नोंदवली आहे.

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकारे झालेल्या या मोठ्या फसवणुकीमुळे पुणे पोलिसांचा सायबर विभाग अलर्ट झाला आहे. विश्रांतवाडी आणि खडकी पोलिसांनी दोन्ही प्रकरणांत गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा आणि त्यांच्या बँक खात्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. ‘झटपट पैसे कमवा’ किंवा ‘उच्च परतावा मिळेल’ अशा कोणत्याही अनोळखी संदेशांवर विश्वास ठेवू नका. तसेच, अज्ञात व्यक्तीला आपली बँक खात्याची माहिती, डेबिट कार्डाचे तपशील किंवा ओटीपी (OTP) देणे पूर्णपणे टाळावे. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी असे सायबर पोलीसांकडून जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

After Bhondubaba, another sex scandal revealed in Nashik! The office boy recorded the video and...

नाशिकमध्ये भोंदूबाबानंतर आणखी एका सेक्स स्कँडलचा खुलासा! ऑफिसबॉयनेच व्हिडीओ रेकॉर्ड केले अन्…

Friday, 3 April 2026, 18:30

पुणेकर वाहतूक कोंडीने त्रस्त, कंत्राटदाराला पाठीशी का घालता? पोलीस आयुक्तांच्या एका पत्रानं महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले

Friday, 3 April 2026, 17:41
Share Market

Share Market : 10 रुपयांपेक्षा कमी किमतीचा शेअर सोमवारी ‘बाजार’ हलवणार; सोमवारी बाजार उघडताच गुंतवणूकदारांची लागणार नजर

Friday, 3 April 2026, 17:06

मतदारयादीच्या कामासाठी गेलेल्या 7 अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले; बंगालमध्ये नेमकं कारण काय? वाचा

Friday, 3 April 2026, 16:58
New twist in the "that" female doctor suicide case that shook Phaltan! PSI Gopal Badane granted bail; Court sets 3 conditions for bail

फलटण हादरवणाऱ्या “त्या” महिला डॉक्टर सुसाईड प्रकरणाला नवं वळण! PSI गोपाळ बदनेला जामीन मंजूर; जामिनासाठी कोर्टाच्या 3 अटी

Friday, 3 April 2026, 16:55
Khokya Bhosale

Khokya Bhosale : “काय गमावलं हे 2 वर्षांनी कळलं…” जेलमधून आल्यावर घर उद्ध्वस्त पाहताच खोक्या भोसलेला अश्रू अनावर

Friday, 3 April 2026, 16:42
Next Post

Jalgaon Missing News: घरातून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, रात्रीच्या प्रवासात नेमकं काय घडलं? पोलीस तपास सुरु

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.