Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रस्ता चुकवल्याने झालेल्या वादविवादात एका कंटेनरचालकांकडून दुसऱ्याचा खून ; लोणीकंद पोलिसांनी ठोकल्या आरोपीला बेड्या …!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 January 2023, 15:49

पुणे : सोलापूर रोडवरुन चाकणला जात असताना रस्ता चुकल्याने दोन कंटेनरचालकांमध्ये झालेल्या वादातून एका चालकाने दुसर्‍या चालकाला गळा दाबून लोखंडी रॉडने मारहाण करुन खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटना तुळापूर ते लोणीकंद रोडवरील सिताईचे समोर गुरुवारी (ता.२६) सायंकाळी ५ वाजता घडली आहे. लोणीकंद पोलिसांनी ट्रकचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

शमशुल अलीअहमद खान (वय २६, रा. चायकला, थाना दुधारा, जि. खल्लाबाद, संत कबीरनगर, उत्तर प्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. तर, शहजाद अब्दुलक्युम अहमद (वय २६, रा. पोखर भिटवा पो. बिशुनपुरवा, जि. बस्ती, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी संजय रामफल कालीरामना (वय ४१, रा. वलसाड, गुजरात) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शमशुल खान आणि शहजाद अहमद तामिळनाडु धर्मपुरी येथून माल घेऊन कंटेनर चाकणला येत होते. सोलापूर रोडवरुन चाकणसाठी ते वळल्यानंतर एका ठिकाणी त्यांना बॅरिकेट लावलेले दिसले. त्यामुळे ते रस्ता चुकून दुसरीकडे गेले. तुळापूर येथे गेल्यावर त्यांना रस्ता चुकल्याचे लक्षात आले. रस्ता चुकल्याने लांबचे वळण घ्यावे लागणार, त्यामुळे जादा खर्च आला, यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. त्यात आरोपी खान याने अहमद याला मारहाण करून त्याचा गळा दाबला.

 

आरोपी खान याने तेथेच असलेला लोखंडी रॉड अहमद याच्या डोक्यात मारला. त्यानंतर अहमद हा निपचित पडला. अहमदचा मृत्यु झाल्याचे लक्षात आल्यावर खान याने त्याचा मृतदेह कंटेनरच्या केबिनमध्ये ठेवून तो पळून गेला. कडेला कंटेनर इतके दिवस का थांबला, हे पाहिल्यावर त्यात पोलिसांना मृतदेह आढळून आला. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी त्या कंटेनरच्या मालकाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी दोन चालक असल्याचे त्यांना समजले. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास करुन खान याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने अहमद याने आपल्याला वाटेत उतरुन दिले. त्यानंतर तो पुढे निघून गेल्याचे सांगितले.

दरम्यान, लोणीकंद पोलिसांनी सोलापूर रोडवरील सर्व टोलनाक्यावरील सीसीटीव्ही तपासले. त्यात खान हा कंटेनरमध्येच असल्याचे दिसून आल्याने पुन्हा त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने अहमद याचा खून केल्याचे कबूल केले. शमशुल खान याला ताब्यात घेतले असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोर महाड रस्त्याने कोकणात जाताय? सावधान! भोर महाड रस्त्यावर दरडी कोसळल्याने पर्यटक अडकले, दरडी हटवण्याचे काम सुरू

Monday, 6 July 2026, 17:34

बिघाडग्रस्त ट्रकवर दुचाकी आदळल्याने डिकसळ येथील युवकाचा जागीच मृत्यू..

Monday, 6 July 2026, 17:19

“अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहू-आळंदीत गर्दी टाळून थेट पुण्यात यावे” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

Monday, 6 July 2026, 16:56

रांजणगाव एमआयडीसीत दादागिरीला नाही थारा! उद्योगांच्या सुरक्षेसाठी पोलीस-उद्योग समन्वय बैठक, खंडणीखोर व महिला छेडछाड करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

Monday, 6 July 2026, 16:51

दौंडच्या विकासाला गती! पाटसमध्ये बाजार समितीसाठी १० एकर जागा मंजूर; आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश

Monday, 6 July 2026, 16:21

इंदापुरात एनसीएमसी कार्ड वितरण शिबिर; २५५ लाभार्थ्यांना कार्डांचे वाटप

Monday, 6 July 2026, 16:09
Next Post

वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील खुनाचे गूढ उकलण्यात वेल्हे पोलिसांना यश ; चौघांना बेड्या तर त्यांच्याकडून २ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.