Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वेल्हे तालुक्यातील रानवडी येथील खुनाचे गूढ उकलण्यात वेल्हे पोलिसांना यश ; चौघांना बेड्या तर त्यांच्याकडून २ कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 28 January 2023, 16:01

वेल्हे : रानवाडी (ता. वेल्हे) ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या खुनाचे गूढ उकलण्यात वेल्हे पोलिसांना यश आले असून शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन विट, लोखंडी अँगल, लोखंडी रॉडने मारहाण करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

विजय प्रफुल्ल काळोखे (वय – ३८, रा. कन्या शाळेशेजारी, विजय लॉज बिल्डींगचेवर, आप्पा बळवंत चौक पुणे-३०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

नितीन रामभाऊ निवंगुणे (वय-५४), विजय दत्तात्रय निवंगुणे (रा. दोघेही आंबी, ता. हवेली) ओंकार नितीन निवंगुणे, पांडुरंग रामभाऊ निवगणे, वय-४९, रा. संतोषनगर, कात्रज, पुणे) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १ कोटी ८३ लाख ७६ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्हे पोलीस ठाण्याच्या रानवडी ग्रामपंचायत हद्दीत १३ ते १८ जानेवारी दरम्यान नितीन निवंगुणे यांच्या पत्र्याच्या कंपाउंडमध्ये नितीन निवंगुणे व विजय निवंगुणे यांनी संगनमत करताना विजय काळोखेची हत्या केली होती. यासाठी त्यांनी वीट, लोखंडी अँगल, रॉड यांच्या साहाय्याने हत्या केली होती. व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देश्याने मृतदेह आरोपीच्या शेतात पुरून ठेवला आहे, अशी तक्रार पोलीस नाईक अजयकुमार शिंदे यांनी पोलिसांना दिली होती.

सदरचा गुन्हा गंबीर असल्याने वेल्हे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान मयत विजय काळोखे घरातून बाहेर जाताना सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम घेऊन गेला असल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे नितीन निवंगुणे याला तपासकमी बोलावले असता, मयत विजय हा दागिने आणि पैसे घेऊन गेला असल्याचे विजयाच्याच नातेवाईकांकडून समजल्याचे नितीन याने सांगितले.

तसेच सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम पाहून लोभ व हव्यासापोटी त्याने संतोषनगर कात्रज येथे स्टिलच्या चिमटयाने विजय काळोखे याचे डोक्यात तोंडावर मारून त्यास जबर जखमी करून त्याचा खुन केला व पुरावा नष्ट व्हावा या उद्देशाने त्याचे प्रेत प्लास्टीकच्या बॅरलमध्ये टाकले. सदरचे प्रेत असलेला प्लास्टीकचा बैलर उचलून इनोव्हा कारमध्ये टाकून रानवडी येथील आरोपी नितीन निवंगुणे याचे जमिनीत आरोपी विजय निवंगुणे याचे सहायाने खड्डयात पुरले असल्याची माहिती पोलिसांना दिली.

दरम्यान, गुन्हयाचे पुढील तपासात तालुका कार्यकारी दंडाधिकारी सी. वेल्हे यानी सी.आर.पी.सी. १७६ प्रमाणे कार्यवाही केली असता मयत विजय यांचा मृतदेह सापडला आहे. सदर मृतदेहाची पाहणी करून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी ओंकार निवंगुणे याच्याकडून पोलिसांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व दुचाकी गाडीसह १ कोटी ८३ लाख ७६ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे करत आहेत.

सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागिय पोलीस अधिक्षक भाउसाहेब ढोले पाटील, हवेली यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पोलीस उप निरीक्षक महेश कदम व पथकातील अंमलदार सुदाम बादल, योगेश जाधव, पोहवा रविंद्र नागटिळक, पंकज मोघे, ज्ञानदिप धिवार, अजयकुमार शिंदे, कांतीलाल कोळपे, आकाश पाटील यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

" कणसातील दाणे संपल्यावर पाखरं उडून जावी तसं मंत्रिपद गेल्यावर लोकांची गर्दी कमी झाली " : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांची व्यथा..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.