Friday, October 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तू मला आवडतेस, मला फोन कर! अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्यास कर्जत पोलिसांकडून जेलची हवा; पोलीस निरीक्षकांची संवेदनशीलता; आरोपी तात्काळ अटकेत..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 11 July 2022, 14:58

पुणे : एका शालेय अल्पवयीन मुलीला ‘तू मला आवडतेस, मला फोन कर’ असे बोलून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी एका मजनूला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

बाबा भास्कर भिसे, (वय-२५ रा. हंडाळवाडी, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी हि कर्जत येथे शाळेला एसटीने येते. शुक्रवारी (ता. ०८ ) नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर ती घराकडे येण्यासाठी बसस्थानकावर येऊन थांबली होती. त्यावेळी बसस्थानकात थांबलेला व त्याच्या अंगात निळा शर्ट व जीन्स पॅन्ट असलेला अनोळखी मुलगा दुचाकी घेऊन (एम.एच १६ सी.एस २६८८) प्राजक्ताच्या जवळ आला व त्याने तिच्याजवळ असलेली दप्तराची बॅग ओढून तिच्या हाताला पकडून चिट्ठी देण्याचा प्रयत्न केला. ‘तू मला आवडतेस, मला फोन कर’ असे बोलून अश्लील हावभाव करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

हा प्रकार घडत असताना शेजारी असलेल्या मुलामुलींनी गाडीचे व त्या मुलाचे फोटो काढले होते. सदरचा प्रकार सदर ठिकाणी हजर असलेल्या विद्यार्थिनींनी कर्जत पोलिसांना कळविला. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस जवान गोवर्धन कदम, मनोज लातूरकर, दीपक कोल्हे, ईश्वर माने यांनी तत्काळ स्थानक गाठले आणि विद्यार्थी विद्यार्थिनींना विचारपूस केली त्यावेळी असे लक्षात आले की सदर ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी सदर मुलाचे फोटो व त्याच्या गाडीचे फोटो काढले होते. त्याचा परिसरात शोध घेतला मिळून आला नाही. घरी आल्यानंतर प्राजक्ताने सर्व प्रकार वडिलांना सांगितला.

 

दरम्यान, कर्जत पोलिसांनी मुलाचा व गाडीचा शोध घेतला असता त्याचे नाव बाबा भास्कर भिसे, राहणार हंडाळवाडी तालुका कर्जत असल्याचे समजले.घडलेल्या घटनेबाबत कर्जत पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या आदेशाने आरोपीला पोलीस अधिकारी अनंत सालगुडे पोलीस जवान गोवर्धन कदम श्याम जाधव सुनील खैरे यांनी तात्काळ अटकही केली आहे.त्यामुळे रोडरोमियो व त्रास देणाऱ्यांसाठी हा मोठा ‘जोर का झटका’ असल्याचे दिसते.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ आनंद सालगुडे पोलीस जवान गोवर्धन कदम मनोज लातूरकर श्याम जाधव ईश्वर माने दीपक कोल्हे ईश्वर नरोटे आदींनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

२०२७ वनडे वर्ल्ड कपच्या थराराला २ ऑक्टोबरपासून होणार सुरूवात! पुन्हा होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला; ICC कडून संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Thursday, 1 October 2026, 23:01

मुंबईत प्रवास करणे झाले महाग! मुंबईच्या ५ प्रवेशद्वारांवर टोलचे दर वाढले; आजपासून नवे दर लागू

Thursday, 1 October 2026, 22:37

दिवेआगर समुद्रात बुडालेल्या ८ विद्यार्थ्यांची नावे समोर! निष्पाप विद्यार्थ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्यभरात शोककळा

Thursday, 1 October 2026, 22:23

उन्नत महामार्गाच्या जमीन मोजणीसाठी राहुल शेवाळेंचा पुढाकार! हडपसर ते उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक; योग्य बाजारभावाची मागणी

Thursday, 1 October 2026, 21:56

ऑगस्ट २०२७ पर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान; राज्य शासनाच्या आदेशामुळे पुणे-पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली

Thursday, 1 October 2026, 21:16

उरुळी कांचन येथील डॉक्टर महिलेच्या घरातून ११ लाखांचे दागिने चोरी! पोलिसांचा तपास अपयशी; पोलिसांकडून ‘अ’ वर्ग फायनल समरीची प्रक्रिया

Thursday, 1 October 2026, 20:24
Next Post

या बाबतीत वर्षभरातच भारत चीनलाही मागे टाकणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp