Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : पुणे, कुरुक्षेत्र ते तुळजापूर… 5 लाखांत विकली गेली पोटची लेक; महिनाभरात 3 वेळा लावलं जबरदस्तीने लग्न, काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 8 March 2026, 19:43
Crime

photo- ai

Crime :  बीडमधून समोर आलेल्या एका प्रकरणाने परिसरात खळबळ उडवली आहे. 21 वर्षीय विवाहित तरुणीला एका महिन्याच्या आत तीन वेळा जबरदस्तीने लग्न लावले गेले. या अमानुष त्रासामुळे पीडितेने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, मानवी तस्करीचा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

माहितीनुसार, लातूरची रहिवासी ही तरुणी दोन वर्षांपूर्वी बीडमध्ये एका तरुणाशी लग्न करून आलेली होती. मात्र तिच्या पतीचे अन्य महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. मानसिक आणि सामाजिक आधार गमावल्यामुळे पीडित तरुणी माहेरी राहण्यासाठी गेली. या दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका महिलेनं तिला पुण्यात एका एजंटकडे पाठवले, “तुझे दुसरे लग्न लावून देतो,” असे आमिष दाखवून.

पीडितेच्या तक्रारीनुसार, एजंटने तिला बाजारात मांडल्यासारखे वागवले. पुण्यातील कात्रजमध्ये एका व्यक्तीकडून 5 लाख रुपये घेऊन जबरदस्तीने लग्न लावले. 10 दिवस राहिल्यानंतर तिला कुरुक्षेत्र येथे 4.5 लाख रुपये घेऊन दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवले. त्यानंतर तुळजापूरमधून कानडी बुद्रुक येथील तिसऱ्या व्यक्तीकडे साडेचार लाख रुपये घेऊन तिसरे लग्न केले गेले.

एवढ्यावरच प्रकरण थांबले नाही; एजंटने चौथं लग्न लावण्याचा फोन करून पीडितेला आणखी मानसिक त्रास दिला. अखेर मानसिक छळ आणि सततच्या जबरदस्तीला कंटाळून तरुणीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला आष्टी तालुक्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
baramati election

baramati election : सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना घातली साद, म्हणाल्या… 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या साहेबांची सून, पण…

Monday, 6 April 2026, 17:24
Next Post
Pune

Pune : सावधान! सिग्नलवर पाकीट बाहेर काढताय? 20 रुपये देणं पडलं महागात; ट्रान्सजेंडर असल्याचे भासवून कार चालकासोबत घडला थरार.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.