Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking: साताऱ्याच्या रेकॉर्डवरील आरोपी लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 30 August 2025, 21:02

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत कुख्यात घरफोडी प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. लखन भोसले असे मृत आरोपीचे नाव असून तो अनेक घरफोडी आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये होता. ही कारवाई आज (दि. 30 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजता करण्यात आली. या दरम्यान त्याचा दुसरा एक साथीदार घटनास्थळावरून पसार होण्यात यशस्वी झाला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शिक्रापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्यांच्या घटना वाढल्या होत्या. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे शिक्रापूरजवळ संशयित आरोपी लखन भोसले आणि त्याचा साथीदार या भागात असल्याची टीप मिळाली.

दोन दिवसांपूर्वी लखन भोसलेने चाकूचा धाक दाखवून एका महिलेच्या गळ्यातील दागिने चोरी केले होते. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला होता. या प्रकरणानंतर तो फरार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी सातारा पोलिसांचे चार सदस्यीय पथक शिक्रापूर येथे रवाना झाले होते. मात्र अटक करण्याच्या प्रयत्नात आरोपी लखन भोसलेने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस गंभीर जखमी झाले.

लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी असून त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे आणि इतर काही जिल्ह्यांत घरफोडी, दरोडे, चोरी, मारहाण अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. पोलिसांनी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनंतर शिक्रापूर परिसरात सापळा रचला होता. दरम्यान, पोलिसांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शस्त्रासह पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात लखन भोसले जागीच ठार झाला.

मात्र त्याचा साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला असून त्याच्या शोधासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. लखन भोसले हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता. त्याचा आज झालेला एन्काऊंटर हा सातारा पोलिसांसाठी मोठा दिलासा ठरला आहे. या घटनेनंतर शिक्रापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले असून फरार आरोपीलाही लवकरच गजाआड केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

'मला दारू प्यायला नाही बोलते का?' बायकोच्या नकारामुळे बापाने स्वतःच्या 8 महिन्यांच्या चिमुकल्यासोबत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.