Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाझर तलावात बुडालेल्या जयदीपचा दुसऱ्या दिवशीही शोध सुरूच

लहू चव्हाणby लहू चव्हाण
Monday, 21 October 2024, 21:42

लहू चव्हाण / पाचगणी : मित्रांसोबत भिलार पाझर तलावात पोहायला गेलेल्या तरुणाचा अद्यापही शोध लागला नाही. काल रविवारी (दि. 20) दुपारी साडेचारच्या सुमारास पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेला जयदीप मुकुंद भिलारे (वय-२६, रा. भिलार, ता. महाबळेश्वर) पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. तेव्हापासून जयदीपचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमने शोध कार्य सुरु केले होते. मात्र, अद्यापही त्याचा शोध लागला नाही.

नेमकं काय घडलं?

मित्र पाण्यात उतरले असता जयदीपलाही पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्याला चांगले पोहता येत नव्हते. तो पाण्यात उतरल्यानंतर पोहत काही अंतर पुढे गेल्यावर तो बुडू लागला. त्यावेळी त्याने वाचवा वाचवा असा आवाज दिला. परंतु काही वेळातच तो खोल पाण्यात बुडाला. यावेळी गावातील मुलांनी तलावात उतरून शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पांचगणी पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

महाबळेश्वर ट्रेकर्स रेस्क्यू टीमच्या आणि पांचगणीतील ऐस. ओ. ऐस. टीमच्या जवानांनी रात्री उशिरा सात वाजता शोध मोहीम सुरू केली. परंतु लाईटच्या उजेडात काहीही यश आले नाही. त्यामुळे ही मोहीम रात्री उशिरा थांबवण्यात आली. त्यानंतर आज सकाळी ही मोहीम सुरू केली. पाणबुडी आणली त्यांनीही सकाळपासून तब्बल १२ तास शोध मोहीम राबवली, तरीसुद्धा जयदीप सापडू शकला नाही. त्यामुळे हतबल झालेल्या जवानांनी शोध मोहीम थांबवली.

 
लहू चव्हाण

लहू चव्हाण

ताज्या बातम्या

पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मोठा विजय! 17 दिवसांच्या उपोषणानंतर सरकार झुकलं; धडाधड GR जारी

Saturday, 29 August 2026, 22:39

धबधब्यावरचा आनंद ठरला अखेरचा!पाय घसरला अन् तरुणी वाहून गेली; दुर्दैवी मृत्यू

Saturday, 29 August 2026, 21:39

पोल्ट्री आणि पशुपालकांच्या न्याय्य हक्कासाठी 1 सप्टेंबरला पुण्यात मूक मोर्चा: GR असूनही अंमलबजावणी का नाही?

Saturday, 29 August 2026, 21:24

खाजगी क्लासला फाटा; स्व-अभ्यासाच्या जोरावर ऋषिकेश बेंद्रे राज्यात प्रथम!

Saturday, 29 August 2026, 20:16

भरधाव कंटेनरची तीन कारला पाठीमागून धडक; खेड-शिवापूरजवळ अपघातात वाहनांचे नुकसान

Saturday, 29 August 2026, 19:56

थेऊरमध्ये विजेचा शॉक लागून महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू

Saturday, 29 August 2026, 19:41
Next Post
five crore rupees cash at khed shivapur toll plaza transfer to income tax department

खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटींची रोकड पकडली; कार सत्तेतील बड्या आमदाराची? 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp